गृह मंत्रालय
लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ 6 फेब्रुवारीपासून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Posted On:
06 FEB 2022 2:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2022
अतिशय जड अंतःकरणाने लता मंगेशकर यांची निधनवार्ता आज भारत सरकारने जाहीर केली. दिवंगत लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ सरकारने देशभर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
06.02.2022 ते 07.02.2022 दरम्यान राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल, तसेच कोणत्याही प्रकारचे मनोरंजनाचे शासकीय कार्यक्रम होणार नाहीत.
लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1795925)
Visitor Counter : 346