संरक्षण मंत्रालय
प्रजासत्ताक दिन संचलन 2022 च्या सर्वोत्तम चित्ररथासाठी उत्तर प्रदेशची निवड; लोकप्रिय निवड श्रेणीत महाराष्ट्र विजयी
मंत्रालयांमधे, शिक्षण मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय संयुक्तरीत्या विजेते; ऑनलाइन मतदानात टपाल विभाग अव्वल
सीआयएसएफला सीएपीएफमधील सर्वोत्कृष्ट संचलन तुकडीचा सन्मान; मायजीओव्ही (MyGov) वर सीआरपीएफ शीर्षस्थानी
सुरक्षा सेवांमध्ये भारतीय नौदलाची सर्वोत्तम संचलन तुकडी म्हणून निवड; भारतीय वायुसेना, लोकप्रिय निवड श्रेणीत विजयी
Posted On:
04 FEB 2022 3:50PM by PIB Mumbai
प्रजासत्ताक दिन संचलन 2022 मधील सर्वोत्कृष्ट चित्ररथ आणि सर्वोत्कृष्ट संचलन तुकडी यासाठीचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. तीन सुरक्षा सेवा, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ)/इतर सहाय्यक दल आणि विविध विभागातील दल, राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालये/विभाग यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी न्यायाधीशांच्या तीन समित्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
समितींच्या मूल्यांकनाच्या आधारे, भारतीय नौदलाच्या संचलन तुकडीला तिन्ही सेवांमध्ये सर्वोत्तम संचलन तुकडी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) सीएपीएफ/इतर सहाय्यक दलांमध्ये सर्वोत्कृष्ट संचलन दल म्हणून निवडण्यात आले आहे.
26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामधे सहभागी झालेल्या 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये उत्तर प्रदेशच्या चित्ररथाची सर्वोत्कृष्ट म्हणून निवडल झाली. उत्तर प्रदेशचा चित्ररथ 'एक जिल्हा एक उत्पादन आणि काशी विश्वनाथ धाम' या संकल्पवेवर आधारित होता.
दुसरे स्थान कर्नाटकच्या ‘पारंपारिक हस्तकले’ वर आधारित चित्ररथाला मिळाले. तिसरे स्थान ‘मेघालयच्या राज्याची 50 वर्षे आणि महिलांच्या नेतृत्वाखालील सहकारी संस्था आणि बचगट यांना मानवंदना’ या विषयावरील चित्ररथासाठी मेघालयला मिळाले.
केंद्रीय मंत्रालये/विभागांच्या श्रेणीमध्ये शिक्षण मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा चित्ररथ संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालय आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या चित्ररथाची संकल्पना ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ होती, तर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा चित्ररथ ‘उडे देश का आम नागरिक’ या संकल्पनेवर आधारित होता. संचलनामध्ये केंद्रीय मंत्रालये/विभागांचे नऊ चित्ररथ सहभागी झाले होते.
'सुभाष @125' या संकल्पनेवर आधारित गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (सीपीडब्लूडी) आणि 'वंदे भारतम' नृत्य गटाची विशेष पारितोषिक श्रेणीसाठी निवड करण्यात आली आहे.
लोकप्रिय निवड पुरस्कार
या व्यतिरिक्त, पहिल्यांदाच, मायजीओव्ही (MyGov) व्यासपीठाद्वारे, लोकप्रिय निवड श्रेणीतील सर्वोत्कृष्ट संचलन दल आणि सर्वोत्कृष्ट चित्ररथासाठी मतदान करण्यासाठी सर्वसामान्यांना आमंत्रित करण्यात आले होते. 25-31 जानेवारी 2022 दरम्यान ऑनलाइन मतदान घेण्यात आले.
लोकप्रिय निवडीनुसार, भारतीय हवाई दलाची संचलन तुकडी तिन्ही सेवांमध्ये सर्वोत्तम संचलन तुकडी म्हणून निवडली गेली आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दलाला (सीआरपीएफ) सीएपीएफ/इतर सहाय्यक दलांमध्ये सर्वोत्तम संचलन दल म्हणून मायजीओव्हीवर (MyGov) सर्वाधिक मते मिळाली.
लोकप्रिय निवड श्रेणीमध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाची सर्वोत्तम म्हणून निवड झाली. महाराष्ट्राचा चित्ररथ ‘महाराष्ट्रातील जैवविविधता आणि राज्य जैव-मानके’ या संकल्पनेवर आधारित होता.
उत्तर प्रदेशाला (लोकप्रिय पसंती) द्वितीय क्रमांक मिळाला, तर ‘जम्मू आणि काश्मीरचा बदलणारा चेहरा मोहरा’ या विषयावरील जम्मू आणि काश्मीरच्या चित्ररथाने तिसरा क्रमांक पटकावला.
लोकांच्या निवडीवर आधारित केंद्रीय मंत्रालये/विभागांमध्ये दळणवळण मंत्रालय/टपाल विभागाच्या चित्ररथाला सर्वोत्कृष्ट घोषित करण्यात आले. ‘भारतीय टपाल: 75 वर्षे @ संकल्प - महिला सक्षमीकरण’ ही चित्ररथाची संकल्पना होती.
***
S.Tupe/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1795432)
Visitor Counter : 1214