माहिती आणि प्रसारण मंत्रालय
प्रजासत्ताक दिनी दूरदर्शनने केलेल्या प्रसारणाला जगभरात व्यापक लोकप्रियता
Posted On:
04 FEB 2022 11:21AM by PIB Mumbai
देशातील महत्वाच्या प्रसंगी दूरदर्शनने केलेल्या सर्वंकष प्रसारणाचा मुद्दा येतो तेव्हा त्याला पर्यायच नसतो हे भूतकाळाचा दाखला देता, वारंवार सिद्ध झाले आहे. यंदा मात्र, 2022 च्या प्रजासत्ताक दिनी, याआधी कधीच पाहिल्या नाहीत अशा वायूसेनेच्या अद्भुतरम्य कसरतींच्या प्रसारणाने, दूरदर्शनने आपल्याच विक्रमांना मागे टाकले आहे.
प्रेक्षकांची माध्यम निवड बदलत असल्याचे यावेळी दिसून आले. दूरदर्शनच्या दूरचित्रवाणी माध्यमाच्या तुलनेत युट्यूब वाहिनीवर प्रजासत्ताक दिनाचे प्रसारण अनुक्रमे 2.3 कोटी आणि 2.6 कोटी वेळा पहिले गेले. दूरदर्शनची व्याप्ती किती प्रचंड आहे, याचेच ही आकडेवारी निदर्शक आहे. यानंतर याची व्यापकता आणखी प्रचंड वाढली जेव्हा 180 पेक्षा अधिक वाहिन्यांनी सकाळी साडेनऊ ते दुपारपर्यंत दूरदर्शनच्या या प्रसारणाची दृश्ये देशभरात दाखवली. एकत्रित आकडेवारीचा विचार करता ती तब्बल 3.2 अब्ज मिनिटे पाहिली गेली..
या ऐतिहासीक प्रजासत्ताक दिन प्रसारणाद्वारे तब्बल 140 देशांमधे आपली प्रेक्षक संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवत, दूरदर्शनने आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांचीही मने जिंकली आहेत. या देशांमधे अमेरिका, कॅनडा, जर्मनी, जपान, फ्रांस, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
देश विदेशातील सर्व घटकातील प्रेक्षकांनी दूरदर्शनच्या या प्रसारणाचे कौतुक केले आहे.
***
SonalT/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1795399)
Visitor Counter : 216