इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
डॉ. मदन मोहन त्रिपाठी यांनी एनआयईएलआयटीचे (NIELIT) महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला
प्रविष्टि तिथि:
02 FEB 2022 3:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी 2022
डॉ. मदन मोहन त्रिपाठी यांनी आज नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT) चे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT) ही केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे.

एनआयईएलआयटीमध्ये रुजू होण्यापूर्वी, डॉ. मदन मोहन त्रिपाठी नवी दिल्ली येथील दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठात (DTU) प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठात त्यांनी अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाचे (IQAC) संचालक आणि बौद्धिक संपदा अधिकार विभागाचे समन्वयक म्हणूनही काम केले.
Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1794691)
आगंतुक पटल : 298