पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

संसदेच्या 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले निवेदन

Posted On: 31 JAN 2022 11:21AM by PIB Mumbai

नमस्‍कार मित्रांनो,

आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होत आहे.मी तुम्हा सर्वांचे आणि देशभरातील सन्माननीय संसद सदस्यांचे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वागत करतो.आजच्या जागतिक परिस्थितीतभारतासाठी विपुल संधी उपलब्ध आहेत. हे अर्थसंकल्पीय अधिवेशनजगभरात केवळ भारताची आर्थिक प्रगतीच नव्हेतर भारतातील लसीकरण अभियानभारताने स्वतः संशोधन करुन विकसित केलेली लस संपूर्ण जगात भारताविषयी एक विश्वास निर्माण करणारी  ठरली आहे.

या अर्थसंकल्पीय अधिवेशनातआम्हा सर्व खासदारांची चर्चाआपल्या खासदारांच्या चर्चेचे मुद्देमोकळ्या मनाने केलेली चर्चाजागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करण्याची एक महत्वाची संधी ठरू शकते.

मला आशा आहेकी सर्व आदरणीय खासदारसर्व राजकीय पक्षअधिवेशनात मोकळ्या मनाने चर्चा करुनप्रगतीच्या मार्गांवर वाटचाल करण्यासाठीत्याला गती देण्यासाठी निश्चितच मदत करतील.

ही खरे आहेकी वारंवार होत असलेल्या निवडणुकांचा परिणाम या अधिवेशनांवरही होतोचर्चावर देखील त्याचा परिणाम जाणवतो. मात्रमी सर्व सन्माननीय खासदारांना विनंती करतोकी निवडणुका आपल्या जागी असतातत्या सुरुच राहणार आहेत.मात्र आपण सभागृहात.. संसदेचे हे अधिवेशनएकप्रकारे पूर्ण वर्षभराचा आराखडा मांडणारे असते आणि म्हणूनच ते खूप महत्वाचेही असते. आपण सर्वांनी पूर्ण कटिबद्धतेनेहे अधिवेशन जितके जास्त फलदायी ठरवू शकूतेवढ्याच जास्त संधी आपल्याला आगामी आर्थिक वर्षातदेशाची प्रगती करण्यासाठी मिळू शकतील.

मुक्त चर्चा व्हावीसभागृहाची प्रतिष्ठा जपत गांभीर्याने चर्चा व्हावीमानवी संवेदनांचा विचार करुन चर्चा व्हावीउत्तम उद्देशाने चर्चा व्हावीही अपेक्षा व्यक्त करत सर्वांना खूप खूप धन्यवाद !

***

JaydeviPS/Radhika/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1793789) Visitor Counter : 306