रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
3.5 टनापेक्षा कमी वजनांच्या भारत स्टेज (बीएस- सहा) वाहनांमध्ये सीएनजी आणि एलपीजी संचाच्या रेट्रो फिटमेंटव्दारे केलेल्या बदलांना परवानगी देण्याच्या आणि डिझेल इंजिनच्या जागी सीएनजी आणि एलपीजीचे इंजिन बसवण्याच्या प्रस्तावाच्या अधिसूचनेचा मसुदा जारी
प्रविष्टि तिथि:
29 JAN 2022 5:52PM by PIB Mumbai
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दि. 27 जानेवारी, 2022 रोजी 3.5 टनापेक्षा कमी वजनांच्या भारत स्टेज (बीएस- सहा) वाहनांमध्ये सीएनजी आणि एलपीजी संचाच्या रेट्रो फिटमेंटव्दारे केलेल्या बदलांना परवानगी देण्याच्या आणि डिझेल इंजिनच्या जागी सीएनजी आणि एलपीजीचे इंजिन बसवण्याची परवानगी देण्याच्या प्रस्तावाच्या अधिसूचनेचा मसुदा जारी केला आहे. सध्या बीएस-चार उत्सर्जन मानकांनुसार मोटार वाहनांमध्ये सीएनजी आणि एपीजी संचाच्या रेट्रो फिटमेंटची परवानगी आहे.
या अधिसूचनेनुसार रेट्रो फिटमेंटसाठी मंजुरी घेण्याची आवश्यकता नमूद केली आहे. सीएनजी हे पर्यावरणपूरक इंधन आहे. याच्या वापरामुळे पेट्रोल आणि डिझेल इंजिनाच्या तुलनेत कार्बन मोनॉक्साइड, हायड्रोकार्बन कण आणि धूर यांचे उत्सर्जन कमी होते.
या प्रस्तावासाठी संबंधितांबरोबर सल्लामसलत करून ही योजना तयार करण्यात आली आहे. याबाबत संबंधित भागधारकांकडून टिप्पण्या आणि सूचना मागविण्यासाठी तीस दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.
बीएस-सहा वाहनांमध्ये रेट्रोफिटमेंटसंबंधी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करावे.
***
S.Patil/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1793513)
आगंतुक पटल : 260