रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डॉ मनसुख मांडविया यांच्या हस्ते राष्ट्रीय औषधोत्पादन शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (एनआयपीइआर) संशोधन पोर्टलचा प्रारंभ


औषधोत्पादन क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी संशोधन आणि नवोन्मेषाची आवश्यकता - डॉ मनसुख मांडविया

तरुण प्रतिभा आणि मानवी संसाधनांच्या प्रवाहीकरणासाठी उद्योग-शैक्षणिक सहकार्य महत्त्वाचे -डॉ मनसुख मांडविया

Posted On: 28 JAN 2022 7:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 जानेवारी 2022

केंद्रीय रसायन आणि खते मंत्री  मनसुख मांडविया यांनी आज रसायने आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्यासह  नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय औषोधोत्पादन  शिक्षण आणि  संशोधन संस्थेच्या (एनआयपीइआर ) संशोधन पोर्टलचा प्रारंभ केला.  उद्योग आणि इतर हितसंबंधितांना, सर्व राष्ट्रीय औषोधोत्पादन  शिक्षण आणि  संशोधन संस्थांसह  त्यांच्या संशोधन उपक्रमांची माहिती, पेटंट कार्यक्षेत्र  आणि प्रकाशन माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने  राष्ट्रीय औषोधोत्पादन शिक्षण आणि  संशोधन संस्था पोर्टल सुरु करण्यात आले आहे.

उद्योग आणि शैक्षणिक या दोन्ही क्षेत्रांमध्ये निकोप  स्पर्धेच्या महत्त्वाकडे लक्ष वेधून केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले  की, आपल्या  नागरिकांसाठी  गुणवत्तापूर्ण कल्पना आणि उपायांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने, स्पर्धा आणि मागणी ही संशोधन आणि नवोन्मेषाची  गरज आहे. औषधोत्पादन  क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी  संशोधन आणि नवोन्मेषाच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. तरुण प्रतिभा आणि मानवी संसाधनांच्या प्रवाहीकरणासाठी  उद्योग-शैक्षणिक सहकार्य महत्त्वाचे आहे ,असे ते म्हणाले.

सध्या सुरू असलेल्या संशोधन कार्याची उपलब्धता प्रमाणित करणे हा या पोर्टलचा उद्देश आहे. हे पोर्टल अन्य  संशोधकांना आणि विशेषत: उद्योगांना  संबंधित संस्थेशी संपर्क साधण्यास मदत करेल, यामुळे संस्था आणि उद्योग एकत्र काम करून  संशोधन अधिक उद्देशपूर्ण आणि अर्थपूर्ण करणे शक्य होणार आहे. दीर्घ काळापासून, संशोधन संस्था पूर्णपणे वेगळ्या राहून  कार्य  करत आहेत.संशोधन पोर्टल सरकारमधील विविध विभागांतर्गत असलेल्या  संशोधन संस्थांना तसेच  या संस्थांना उद्योगांसह एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल.यादृष्टीने  रसायन आणि खते मंत्रालयाने, या पोर्टलमध्ये सहभागी  होण्यासाठी, औषधोत्पादन क्षेत्राशी संबंधित अनेक संशोधन केले जाते अशा सर्व संबंधित संशोधन संस्था असलेल्या  जैवतंत्रज्ञान विभाग,आयुष  विभागाचा वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग , आयसीएमआर , संरक्षण संशोधन आणि विकास संस्था  इ. संस्थांना विनंती केली आहे.

पोर्टल पाहण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा:

http://nipermis.pharmaceuticals.gov.in/

 

 

 

M.Chopade/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1793363) Visitor Counter : 274