संरक्षण मंत्रालय
किनारा आधारित जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीच्या निर्यातीसाठी ब्राह्मोसचा फिलिपिन्ससोबत करार
Posted On:
28 JAN 2022 3:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2022
फिलीपिन्सला किनारा आधारित जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीचा पुरवठा करण्यासाठी, ब्राह्मोस एअर स्पेस प्रायव्हेट लिमिटेडने (बीएपीएल ) 28 जानेवारी 2022 रोजी फिलीपिन्स प्रजासत्ताकच्या राष्ट्रीय संरक्षण विभागाशी करार केला. ब्राह्मोस एअर स्पेस प्रायव्हेट लिमिटेड ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा संयुक्त उपक्रम असलेली कंपनी आहे. विश्वासार्ह संरक्षण निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या भारत सरकारच्या धोरणासाठी हा करार एक महत्त्वाचे पाऊल आहे.
Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1793252)
Visitor Counter : 301