उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

निवडणुका अधिक सर्वसमावेशक बनवण्यासाठी 75% मतदानाचे उपराष्ट्रपतींचे आवाहन


एकाचवेळी निवडणुका घेण्यावर सहमती व्हावी - वेंकैय्या नायडू

विश्वासार्ह, दूरदृष्टी असणारी संस्था म्हणून निवडणूक आयोगाची केली प्रशंसा

Posted On: 25 JAN 2022 4:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2022

आगामी सार्वत्रिक निवडणुकीत 75% मतदान सुनिश्चित करून निवडणूक लोकशाही अधिक सर्वसमावेशक बनविण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांनी आज निवडणूक आयोग आणि नागरिकांना केले तसेच विकासाची गती  कायम ठेवण्यासाठी एकाचवेळी निवडणुका घेण्यावर सहमती व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आज 12 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त दिलेल्या संदेशात नायडू यांनी, एकही मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये यावर भर दिला आणि निवडणुक लढवणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार मत द्यावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.  नायडू यांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे ते  हैदराबादमध्ये गृहविलगीकरणात आहेत त्यामुळे नवी दिल्लीतील कार्यक्रमात त्यांचा संदेश  वाचून दाखवण्यात आला.

1951-52 मध्ये झालेल्या लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत झालेल्या 44.87% मतदानावरून 2019 मध्ये 17व्या लोकसभेसाठी आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक 67.40% मतदानाची नोंद झाली, मतदानात 50% वाढ झाल्याचा संदर्भ देत, यासाठी नायडू यांनी सर्व हितसंबंधितांची प्रशंसा केली.

देशाच्या 70 वर्षांच्या निवडणूक प्रवासात उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय निवडणूक आयोगाने या संदर्भात सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करत, लोकशाहीत प्रत्येक मतदाराला अभिमान वाटू शकेल अशी विश्वासार्ह, उत्तरदायित्व निभावणारी आणि दूरदृष्टी असणारी संस्था अशी नायडू यांनी निवडणूक आयोगाची प्रशंसा केली.

2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत महिलांनी पुरुषांपेक्षा 0.17% जास्त मतदान केले, 70 वर्षांमध्ये मतदानाच्या बाबतीत प्रथमच लिंग असामानते मधली दरी संपुष्टात आल्याबद्दल नायडू यांनी आनंद व्यक्त केला.

"आपल्या निवडणुका सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागात्मक बनवणे" या संकल्पनेवर 12 व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. 26 जानेवारी 1950 ला  देश प्रजासत्ताक होण्याच्या एक दिवस अगोदर 25  जानेवारी 1950. रोजी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली म्हणून 25 जानेवारी हा दिवस मतदार दिवस म्हणून  साजरा केला जातो.

उपराष्ट्रपतींच्या संदेशाचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे आहे (भारतीय निवडणूक आयोगाने आज आयोजित केलेल्या 12 व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात तो वाचून दाखवण्यात  आला)

 

 

 

 

S.Thakur/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1792499) Visitor Counter : 482