गृह मंत्रालय

प्रजासत्ताक दिन, 2022 निमित्त अग्निशमन सेवा, गृहरक्षक (एचजी) आणि नागरी संरक्षण (सीडी) कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदके जाहीर

Posted On: 25 JAN 2022 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2022

प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना शौर्य पदक आणि विशिष्ट सेवांसाठी राष्ट्रपती पदक तसेच शौर्य पदक आणि गुणवंत सेवा पदके प्रदान केली जातात.

2022 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 42 जवानांना अग्निशमन सेवा पदके घोषित करण्यात आली.

यापैकी 1 जवानास राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक आणि 2 जवानांना त्यांच्या संबंधित शौर्याबद्दल, शौर्यासाठीचे अग्निशमन सेवा पदक जाहीर  करण्यात आले आहे.

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक 9 कर्मचाऱ्यांना आणि 30 कर्मचाऱ्यांना त्यांच्या संबंधित विशिष्ट आणि गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट सेवांसाठी अग्निशमन सेवा पदक यांची घोषणा   करण्यात आली.

याव्यतिरिक्त, 25 कर्मचारी/स्वयंसेवकांना प्रजासत्ताक दिन, 2022 निमित्त गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदके देखील जाहीर करण्यात आली आहेत. यापैकी, विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदक तसेच गृहरक्षक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी नागरी संरक्षण पदकांनी अनुक्रमे 2 आणि 23 कर्मचाऱ्यांना घोषित  करण्यात आले.

महाराष्ट्रातील पुढील विजेत्यांना पदके जाहीर करण्यात आली आहेत .

महाराष्ट्रातील फायरमन शे.बाळू दामू देशमुख यांना बचावकार्यासाठी मरणोत्तर शौर्यासाठीचे राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर करण्यात आले.

शे.प्रशांत दादाराम रणपिसे (मुख्य अग्निशमन अधिकारी) यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर करण्यात आले. 

गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट सेवांसाठी अग्निशमन सेवा पदक प्राप्त करणाऱ्यांमधे महाराष्ट्रातील पुढील विजेत्यांचा समावेश आहे :

शे.किरण बालमुकुंद गावडे, मुख्य अग्निशमन अधिकारी

शे.संजय यशवंत मांजरेकर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी

शे.सुरेश विष्णू पाटील, लिडींग फायरमन

शे.संजय दत्ताराम म्हामुणकर, लिडींग फायरमन

शे. चंद्रकांत नारायण आनंददास, फायरमन

परिशिष्ट

प्रजासत्ताक दिन, 2022 च्या निमित्ताने अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांना खालील तपशिलांनुसार अग्निशमन सेवा पदके घोषित करण्यात आली. यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

Jaydevi PS/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1792468) Visitor Counter : 340