PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 24 JAN 2022 7:17PM by PIB Mumbai

Description: https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png Description: https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 162.26 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 22,49,335
  • Active cases stand at 5.69%
  • Recovery Rate currently at 93.07%
  • 2,43,495 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,68,04,145
  • 3,06,064 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (20.75%)
  • Weekly Positivity Rate (17.03%)
  • 71.69 cr Total Tests conducted so far; 14,74,753 tests conducted in the last 24 hours

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Description: Image

Description: Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 24 जानेवारी 2022

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या जवळपास 27 लाख (27,56,364) मात्रा देण्यात आल्या. त्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 162 कोटी 26 लाखांचा (1,62,26,07,516) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 1,75,24,670 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

गेल्या 24 तासात 2,43,495 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात (महामारीची  सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,68,04,145 झाली आहे. परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता  93.07 टक्के  इतका झाला आहे.

गेल्या 24 तासांत, देशात 3,06,064 नव्या कोविड बाधितांची  नोंद झाली. भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 22,49,335  इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 5.69 टक्के  इतके आहे.

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरू आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 14,74,753 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 71 कोटी 69 लाखांहून अधिक (71,69,95,333) चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 17.03 टक्के आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 20.75 टक्के इतका आहे.

 

इतर अपडेट्स :

  • राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही लसीच्या न वापरलेल्या 13 कोटी 83 लाखांपेक्षा अधिक मात्रा शिल्लक आहेत.

 

महत्त्‍वाचे ट्विट्स

 

 

 

 

* * *

M.Chopade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1792256) Visitor Counter : 154