आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 162.62 कोटींपेक्षा अधिक मात्रा देण्याचे काम पूर्ण


गेल्या 24 तासात कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 27 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

देशातील रोगमुक्ती दर सध्या 93 .07 टक्के

गेल्या 24 तासात देशात 3,06,064 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची कोविड सक्रिय रुग्णसंख्या 22,49,335

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 17.03 टक्के

Posted On: 24 JAN 2022 9:27AM by PIB Mumbai

गेल्या 24 तासांच्या कालावधीतकोविड प्रतिबंधक लसीच्या जवळपास 27 लाख (27,56,364) मात्रा देण्यात आल्या. त्यामुळेआज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसारभारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 162 कोटी 26 लाखांचा (1,62,26,07,516) टप्पा ओलांडला आहे.

देशभरात 1,75,24,670 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसारकोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,92,126

2nd Dose

98,21,360

Precaution Dose

27,40,418

FLWs

1st Dose

1,83,91,199

2nd Dose

1,71,41,611

Precaution Dose

26,87,668

Age Group 15-18 years

1st Dose

4,19,32,411

Age Group 18-44 years

1st Dose

53,45,36,314

2nd Dose

38,84,23,497

Age Group 45-59 years

1st Dose

19,91,58,553

2nd Dose

16,65,46,977

Over 60 years

1st Dose

12,41,24,617

2nd Dose

10,39,58,686

Precaution Dose

27,52,079

Precaution Dose

81,80,165

Total

1,62,26,07,516

 

 

गेल्या 24 तासात 2,43,495 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळेदेशात (महामारीची  सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,68,04,145 झाली आहे.

परिणामीभारतातील रोगमुक्ती दर आता  93.07 टक्के  इतका झाला आहे.

 

गेल्या 24 तासांतदेशात 3,06,064 नव्या कोविड बाधितांची  नोंद झाली.

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 22,49, 335  इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 5.69 टक्के  इतके आहे.

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरू आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 14,74,753 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 71 कोटी 69 लाखांहून अधिक (71,69,95,333) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाचदेशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 17.03 टक्के आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 20.75 टक्के इतका आहे.

***

JaideviPS/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1792109) Visitor Counter : 216