सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
यशोगाथा -उद्यम नोंदणीमुळे कंपनीची आगेकूच
Posted On:
24 JAN 2022 6:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जानेवारी 2022
सूक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने(MSME) , नेक्सस प्रायव्हेट लिमिटेडच्या मदीम जहागीरदार यांना आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी आणि सरकारी निविदांचा लाभ घेण्यासाठी उद्यमची नोंदणी मिळवून देत मदत केली. आपल्या उद्योगाद्वारे मुलांसाठी तयार केलेली शिक्षणाची नाविन्यपूर्ण उत्पादने भारतातील प्रत्येक मुलापर्यंत पोहोचावीत यासाठी त्यांनी कठोर परिश्रम केले होते; परंतु त्यांच्या या प्रवासात त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. हे सर्व अडथळे एमएसएमई मंत्रालयाने दूर केले.
ते म्हणाले,की "#Udyam नोंदणी प्राप्त केल्यानंतर मला निविदा अंदाजावरील सूट (EMD सूट), एकूण विक्रीवरील सूट इत्यादी लाभ मिळू शकले ज्यामुळे माझ्या कंपनीला पुढे जाण्यास मदत झाली." त्यांची उत्पादने आता आपल्या देशातील असंख्य मुलांना लाभ मिळवून देत आहेत.
* * *
M.Chopade/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1792222)
Visitor Counter : 190