आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 161 कोटी 92 लाखांपेक्षा अधिक मात्रा देण्याचे काम पूर्ण


गेल्या 24 तासात कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 71 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

देशातील रोगमुक्ती दर सध्या 93.18 टक्के

गेल्या 24 तासात देशात 3,33,533 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची कोविड सक्रिय रुग्णसंख्या 21,87,205

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 16.87 टक्के

Posted On: 23 JAN 2022 9:19AM by PIB Mumbai

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या जवळपास 71 लाख (71,10,445) मात्रा देण्यात आल्या. त्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 161 कोटी 92 लाखांचा (1,61,92,84,270) टप्पा ओलांडला आहे.


देशभरात 1,74,72,203 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,91,997

2nd Dose

98,17,823

Precaution Dose

27,07,857

FLWs

1st Dose

1,83,90,938

2nd Dose

1,71,33,844

Precaution Dose

26,22,380

Age Group 15-18 years

1st Dose

4,15,77,103

Age Group 18-44 years

1st Dose

53,39,04,245

2nd Dose

38,70,64,716

Age Group 45-59 years

1st Dose

19,90,38,358

2nd Dose

16,61,68,085

Over 60 years

1st Dose

12,40,49,287

2nd Dose

10,37,37,618

Precaution Dose

26,80,019

Precaution Dose

80,10,256

Total

1,61,92,84,270

 

गेल्या 24 तासात 2,59,168 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात (महामारीची सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,65,60,650 झाली आहे.


परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 93.18 टक्के झाला आहे.


गेल्या 24 तासात, देशात 3,33,533 नव्या कोविड बाधितांची  नोंद झाली.


भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 21,87, 205  इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 5.57 टक्के आहे.

 

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरू आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 18,75,533 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 71 कोटी 55 लाखांहून अधिक (71,55,20,580) चाचण्या करण्यात आल्या आहेत.


देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 16.87 टक्के आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 17.78 टक्के इतका आहे.

***


ST/SampadaP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1791922) Visitor Counter : 188