वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

जागतिक व्हेंचर कॅपिटल फंडांनी द्वितीय आणि तृतीय श्रेणीतल्या शहरांमधील स्टार्टअपवर लक्ष केंद्रित करण्याचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आवाहन


पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाद्वारे आयोजित जागतिक व्हेंचर कॅपिटल फंड्सचे चौथे गोलमेज संमेलन

Posted On: 14 JAN 2022 3:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जानेवारी 2022

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी जागतिक  व्हेंचर कॅपिटल, व्हिसी  फंडांना द्वितीय आणि तृतीय श्रेणीतल्या शहरांमधील स्टार्टअपवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे.  वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन  विभागाने आयोजित केलेल्या ग्लोबल व्हेंचर कॅपिटल फंडांच्या चौथ्या गोलमेज परिषदेचे अध्यक्षपद भूषवताना, गोयल यांनी व्हेंचर कॅपिटलनी, गुंतवणूकीच्या नव्या क्षेत्रांचा शोध घ्यावा,युवा भारतीय उद्योजकांनी निर्माण केलेल्या बौद्धिक संपदेचे जतन करून त्याला प्रोत्साहन द्यावे,जोखमीच्या भांडवलासह अधिक भांडवल वृद्धीसाठीच्या शक्यतांचा शोध घ्यावा असे आवाहन केले.  स्टार्टअपला पाठिंबा देण्यासाठी सरकारने यापूर्वीच अनेक पावले उचलली आहेत आणि भविष्यातही नव्या योजना आखल्या जातील , असेही ते म्हणाले.

या बैठकीत असे निदर्शनास आणून देण्यात आले, की  भारतात 55 उद्योगांमध्ये पसरलेल्या 61,000 हून अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत, त्यापैकी 45% द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांमधून उदयास आले आहेत आणि 45% स्टार्टअप्समध्ये किमान एक तरी महिला संचालक आहे, जे आमच्या विविधतेची साक्ष देते, तसेच भारतातील स्टार्टअप यंत्रणेचा प्रसार आणि सर्वसमावेशकता दर्शवते.  विशेषत: स्टार्टअप इकोसिस्टमसाठी, व्यवसाय सुलभ करणे(ईझ ऑफ डुईंग बिझनेस), भांडवल उभारणी सुलभ करणे आणि अनुपालन भार कमी करणे यासाठी सरकारने 49 नियामक सुधारणा हाती घेतल्या आहेत,याकडेही लक्ष वेधण्यात आले.

स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीकचा एक भाग म्हणून  ही गोलमेज परिषद, दुरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. अमेरिका, जपान, कोरिया, सिंगापूर आणि भारतात अधिवास  असणाऱ्या काही जागतिक  फंड्समधील 75 हून अधिक व्हीसी फंड गुंतवणूकदारांनी या चर्चेत भाग घेतला.  या फंडांमध्ये भारतात 30 अब्ज अमेरिकन डॉलर्स (USD 30 बिलियन) पेक्षा जास्त मालमत्ता व्यवस्थापनाखाली(AUM) आहे.

या क्षेत्रात गुंतवणूकदारांच्या भावना लक्षात घेणाऱ्या  अनेक सूचना ग्लोबल व्हीसी फंडांनी यावेळी केल्या.

 

  

 

 

 

 

N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1789929) Visitor Counter : 146