उपराष्ट्रपती कार्यालय
मकर संक्रांती, पोंगल, बिहू आणि इतर सणांच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा
Posted On:
13 JAN 2022 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2022
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी मकर संक्रांती आणि पोंगलच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे आहे -
'' मी मकर संक्रांती आणि पोंगलच्या मंगल प्रसंगी आपल्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि शुभकामना व्यक्त करतो.
सूर्य देवाला समर्पित, मकर संक्रांती मंगलदायी उत्तरायण कालावधीचा शुभारंभ दर्शवते. आपल्या देशाच्या विविध भागात हा सण वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. तामिळनाडूमध्ये पोंगल, आसाममध्ये बिहू, केरळमध्ये विशू, पंजाब आणि हरयाणामध्ये याला लोहरी आणि बिहारमध्ये हा सण खिचडी या नावाने साजरा करतात. देशाच्या मूळ सांस्कृतिक एकतेचे प्रतिबिंब दर्शवणारे हे सर्व सण चांगले पीक, समृद्धी आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहेत.
मकर संक्रांती प्रत्येकाच्या आयुष्यात समृद्धी, शांतता आणि सौहार्द घेऊन येवो."
संदेशाची हिंदी आवृत्ती खालीलप्रमाणे -
“मैं मकर संक्रांति और पोंगल के पावन अवसर पर अपने सभी देशवासियों को हार्दिक बधाई और शुभकामनाएं देता हूं।
सूर्य भगवान को समर्पित मकर संक्रांति उत्तरायण की पावन अवधि के शुभारंभ का प्रतीक है। यह त्योहार देश भर में भिन्न-भिन्न नामों से मनाया जाता है। इसे तमिलनाडु में पोंगल, असम में बिहू, केरल में विशु, पंजाब और हरियाणा में लोहड़ी तथा बिहार में खिचड़ी त्योहार के नाम से मनाया जाता है। हमारे देश की अंतनिर्हित सांस्कृतिक एकता को दर्शाने वाले ये सभी त्योहार अच्छी फसल, समृद्धि और कृतज्ञता का प्रतीक हैं।
मैं कामना करता हूँ कि मकर संक्रांति सभी के जीवन में समृद्धि, शांति और सौहार्द लाए।”
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1789655)
Visitor Counter : 281