माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

टीआरपी म्हणजेच दूरचित्रवाणी प्रेक्षकसंख्या मापन मानांकनाची बार्क कडून पुन्हा सुरुवात

Posted On: 12 JAN 2022 8:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 जानेवारी 2022

 

टीआरपी- म्हणजेच दूरचित्रवाणी प्रेक्षकसंख्या मापन(प्रणाली) समितीचा अहवाल आणि ट्राय- म्हणजेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने 28 एप्रिल 2020 रोजी केलेल्या शिफारसीनुसार, मेसर्स ब्रॉडकास्ट ऑडीयन्स रिसर्च काऊंसिल (बार्क) ने आपल्या प्रक्रिया, प्रोटोकॉल्स, आणि प्रशासकीय संरचनेतील बाह्य देखरेख यंत्रणा यांच्यात बदल करण्यास सुरुवात केली आहे. मंडळ(बोर्ड) आणि तंत्रज्ञान समितीची फेररचना करुन, त्यानुसार, तंत्रज्ञान समितीत स्वतंत्र सदस्यांचा समावेश करण्याची प्रक्रियाही बार्क ने सुरु केली आहे. त्याशिवाय एक स्थायी देखरेख समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. त्याशिवाय, डेटा म्हणजेच आकडेवारी मिळवण्यासाठीचे नियम नव्याने तयार करण्यात आले असून, ते अधिक कठोरही करण्यात आले आहेत. 

बार्क ने हाती घेतलेल्या या बदलांची माहिती ते संबंधित लोकांपर्यंत ते पोहोचवत असून, हे नवे प्रस्ताव लोकांना समजावून सांगत आहेत, जेणेकरुन, नव्या प्रोटोकॉलनुसार, लवकरच सुरुवात करता येईल.

याची दखल घेत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बीएआरसी ला तत्काळ प्रभावाने न्यूज रेटिंग्ज जारी करण्यास सांगितले आहे. तसेच, मासिक स्वरूपातील डेटा जाहीर करण्याच्या प्रकारातील, कार्यक्रमांची गेल्या तीन महिन्यातील आकडेवारी देखील लगेचच जारी करावी,ज्यामुळे, प्रेक्षकांचा वास्तविक कल  कोणत्या कार्यक्रमांकडे आहे, याचे वाजवी आणि समान प्रातिनिधिक स्वरुप कळू शकेल. सुधारित प्रणालीनुसार, बातम्या आणि व्यावसायिक स्वरूपाच्या कार्यक्रमांची नोंद, “चार आठवड्यांच्या सरासरी संकल्पने’ नुसार ठेवली जाईल.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, प्रसार भारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली  एक ‘कार्यकारी गट’ स्थापन केला आहे. हा गट, रिटर्न पाथ डेटा (RPD) च्या क्षमतेचा  कशा प्रकारे वापर करता येईल, यावर विचार करेल. ट्राय आणि टीआरपी समितीच्या अहवालातही हीच शिफारस करण्यात आली आहे. ही समिती आपला सविस्तर अहवाल चार महिन्यांत सादर करेल.

 

* * *

S.Patil/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1789481) Visitor Counter : 239