वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
कृषी बाजारपेठांमध्ये प्रवेशासाठी झालेल्या सुधारणांमुळे भारत-अमेरिका व्यापार आणि वाणिज्य व्यवहारांना नवी चालना
भारतीय आंबे आणि डाळिंबांना अमेरिकी बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळाला
परस्परांकडे शेतकी बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळ्वण्यासंबंधी अंमलबजावणीच्या आराखडा करारावर भारताचा कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग (DAC&FW) आणि अमेरिकेचा कृषी विभाग यांनी केल्या स्वाक्षऱ्या
Posted On:
08 JAN 2022 4:05PM by PIB Mumbai
भारत-अमेरिका व्यापार धोरण मंचाच्या (TPF च्या) 23 नोव्हेम्बर 2021 रोजी झालेल्या बाराव्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, भारताचा कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग (DAC&FW) आणि अमेरिकेचा कृषी विभाग यांनी, परस्परांकडे कृषी बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळ्वण्यासंबंधी अंमलबजावणीच्या आराखडा करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यानुसार, भारतीय आंबे आणि डाळिंबांना तसेच डाळिंबाच्या दाण्यांना परीक्षणपश्चात बाजारपेठ प्रवेश मिळणार आहे. तर अमेरिकेच्या चेरी आणि अल्फाल्फा गवताला भारतात प्रवेश मिळणार आहे.
जाने-फेब्रु 2022 पासून आंबे आणि डाळिंबांची निर्यात सुरु होत असून, डाळिंबाच्या दाण्यांची निर्यात एप्रिल 2022 पासून सुरु होणार आहे. तर अमेरिकेतून चेरी आणि अल्फाल्फा गवताची निर्यात एप्रिल 2022 पासून सुरु होणार आहे.
त्याशिवाय, मंत्रीस्तरीय चर्चांच्या आधारे, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय विभागानेही अमेरिकी डुकराच्या मांसाला बाजारप्रवेश देण्याची तयारी दाखविली आहे. याला अंतिम स्वरूप देण्यासाठी आरोग्य आणि स्वच्छता विषयक अंतिम प्रमाणपत्राची स्वाक्षऱ्या झालेली प्रत दाखल करण्याची विनंती विभागाने केली आहे.
***
S.Patil/J.Waishampayan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1788557)
Visitor Counter : 409