आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 150 कोटी 61 लाखांहून अधिक मात्रा देण्याचे काम पूर्ण


गेल्या 24 तासात, कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 90 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

देशातील रोगमुक्ती दर सध्या 97.30%

गेल्या 24 तासांत देशात 1,41,986 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची कोविड सक्रिय रुग्णसंख्या 4,72,169

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 5.66% आहे

Posted On: 08 JAN 2022 10:01AM by PIB Mumbai

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 90 लाखांहून अधिक (90,59,360) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 150 कोटी 61 लाखांचा (150,61,92,903) टप्पा ओलांडला आहे.

देशभरात 1,60,89,073 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, नागरिकांना आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे-:

 

 

HCWs

1st Dose

10388777

2nd Dose

9736651

 

FLWs

1st Dose

18387012

2nd Dose

16953203

Age Group 15-18 years

1st Dose

20234580

 

Age Group 18-44 years

1st Dose

511640381

2nd Dose

348330801

 

Age Group 45-59 years

1st Dose

195803770

2nd Dose

155074089

 

Over 60 years

1st Dose

122103139

2nd Dose

97540500

Total

1506192903

 

गेल्या 24 तासात 40,895 रुग्ण कोविड आजारातून बरे झाले. त्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,44,12,740 झाली आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर 97.30% झाला आहे.

गेल्या 24 तासांत, 1,41,986 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

भारतातील कोविड सक्रिय (उपचाराधीन) रुग्णसंख्या सध्या 4,72,169 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रिय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.34% आहे.

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 15,29,948 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 68 कोटी 84 लाखांहून अधिक (68,84,70,959) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 5.66% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 9.28% इतका आहे.

***

ST/JW/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1788516) Visitor Counter : 182