आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ओमायक्रॉन अद्ययावत माहिती
केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या आगमनासाठीच्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी
सर्व प्रवाशांना भारतात आल्यावर सात दिवसांसाठी गृहविलगीकरणात राहणे अनिवार्य तसेच आठव्या दिवशी- आरटी-पीसीआर चाचणी करावी लागणार
सुधारित मार्गदर्शक सूचना 11 जानेवारी 2022 पासून लागू होणार
Posted On:
07 JAN 2022 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जानेवारी 2022
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये 6 जानेवारी 2022 पासून बदल केले आहेत. कोविड-19 विषाणूचे बदलते स्वरुप आणि ओमायक्रॉन सारख्या उत्परिवर्तित विषाणूमुळे तसेच जगभरात वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे या नव्या मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. या नव्या सूचना 11 जानेवारी 2022 , मध्यरात्रीपासून लागू होतील.
या आधीच्या मार्गदर्शक सूचना 30 नोव्हेंबर रोजी लागू झाल्या होत्या.
सुधारित मार्गदर्शक सूचना, आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्या खालील लिंकवर बघता येतील.
https://www.mohfw.gov.in/pdf/RevisedGuidelinesforInternationalArrivalsdated7thJanuary2022.pdf
नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये खालील बदल करण्यात आले आहेत.
सर्व प्रवाशांना, ( यात ज्यांची अचानक चाचणीसाठी निवड करण्यात आली आणि त्यानंतर त्यांची चाचणी निगेटिव्ह आली अशा 2% प्रवाशांचाही समावेश असेल) सात दिवस गृह विलगीकरणात राहावे लागेल आणि आठव्या दिवशी आरटी-पीसीआर चाचणी करावी लागेल.
प्रवाशांना आठ दिवसांनी केलेल्या आपल्या कोविड RT-PCR चाचणी अहवालाचा फोटो ,एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागेल ( यावर संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेश देखरेख ठेवतात)
सर्व प्रवाशांना, ज्यांना ही चाचणी करायची आहे, त्यांना एअर सुविधा पोर्टलवर चाचणीची पूर्वनोंदणी करावी लागेल, जेणेकरुन, त्यांची चाचणी वेळेत होऊ शकेल.
* * *
S.Patil/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1788459)
Visitor Counter : 273