ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
आताची वेळ ही चार ‘एस’ची वेळ- स्पीड (गती), स्किल (कौशल्य), स्केल (उंची) आणि स्टँडर्ड (दर्जा): केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
Posted On:
07 JAN 2022 3:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जानेवारी 2022
भारतीय मानक विभागाने 6 जानेवारी 2022 रोजी आपल्या यशस्वी कारकीर्दीची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. देशात मानके निश्चित करण्यासाठीची एक संस्था असावी, या हेतूने 1947 साली बीआयएसची स्थापना करण्यात आली. एखाद्या वस्तूचा दर्जा निश्चित करणे आणि तसे प्रमाणपत्र प्रदान करणे या मुख्य कामासह, बीआयएस गेल्या 75 वर्षांपासून देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देत आहे.
या संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी बीआयएस संस्थेला आणि त्यांच्याशी संबंधित सर्वांना दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक विभाग तसेच बीआयएसच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधतांना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले- “पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री देखील नव्हते, त्यावेळी त्यांनी तीन ‘एस’ ची संकल्पना मांडली होती- स्पीड म्हणजेच गती, स्कील म्हणजे कौशल्य, आणि स्केल म्हणजेच ऊंची किंवा व्याप्ती. आता त्यात आणखी एक एस जोडण्याची गरज आहे, तो ‘एस’ म्हणजे स्टँडर्ड म्हणजेच दर्जा!
एक देश, एक मानक ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. त्यामुळेच आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जम बसवायचा असेल, तर कौशल्याने काम करत एक मानक निश्चित करणे आवश्यक आहे.
उत्पादनांची मानकनिश्चिती आणि त्यात एक प्रमाण असल्यास, त्यामुळे ग्राहकांनाही, सुरक्षित, विश्वासार्ह आणि उच्च दर्जाचे उत्पादन मिळण्याची खात्री असेल, आणि म्हणूनच येत्या काही वर्षात आपले काम अधिक महत्वाचे आणि कालसुसंगत ठरणार आहे, असे गोयल पुढे म्हणाले.
बीआयएस ने ग्राहकांना दर्जाबद्दल अधिक जागृत करावे, यावर गोयल यांनी भर दिला. गुणवत्ता नियंत्रणाचा एक अर्थ, दर्जाबाबत विश्वास आणि गुणवत्तेची हमी, असाही असतो, असे गोयल यांनी सांगितले.
बीआयएसच्या प्रगतीसाठी गोयल यांनी पांच मंत्र देखील सांगितले.
* * *
S.Tupe/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1788315)
Visitor Counter : 191