आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19: गैरसमज आणि वस्तुस्थिती

Posted On: 04 JAN 2022 9:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जानेवारी 2022

केंद्राने आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणा सज्जता पॅकेज टप्पा-II अंतर्गत केवळ 26.14% निधी जारी केल्याचा दावा करणारा प्रसारमाध्यमातील अहवाल चुकीचा  आणि दिशाभूल करणारा आहे.

केंद्र सरकारने प्रसारमाध्यमातील बातम्यांमध्ये केलेल्या दाव्यानुसार 26.14% नव्हे तर राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी राखून ठेवलेल्या निधीपैकी 50% निधी जारी केला आहे.

एका वृत्तवाहिनीने अलीकडेच दावा केला आहे की केंद्र सरकारने केवळ 26.14% ECRP-II अर्थात आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणा सज्जता पॅकेज टप्पा-II निधी राज्यांना वितरित केला आहे. वृत्त वाहिनीने पुढे दावा केला आहे की केंद्राने नोव्हेंबर 2021 पर्यंत निधी वितरित केला आहे आणि राज्यांनी मंजूर निधीपैकी 60% निधी वापरला आहे. बातमीतील  अहवाल चुकीचा आहे आणि दावे खोटे, दिशाभूल करणारे आणि चुकीच्या तथ्यांवर आधारित आहेत.

मंत्रिमंडळाने 8 जुलै 2021 रोजी भारत कोविड-19 आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणा सज्जता पॅकेज टप्पा-II (ECRP-फेज-II) ला मंजूरी दिली. 1 जुलै 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत 23,123 कोटी रुपये किमतीची (केंद्रीय हिस्सा - 15,000 कोटी रुपये आणि राज्याचा हिस्सा - 8,123 कोटी रुपये) ही योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना काही केंद्रीय क्षेत्र (CS) घटकांसह एक केंद्र पुरस्कृत योजना (CSS) आहे.

योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच, केंद्र सरकारने कृतीशील उपाययोजना केल्या आणि 22/07/2021 रोजी राज्य/केंद्रशासित प्रदेशांना केंद्राच्या वाट्यापैकी 15% निधी जारी केला. निधीचा दुसरा हप्ता ऑगस्ट 2021 मध्ये राज्यांना आगाऊ म्हणून लवकरच जारी करण्यात आला. 24 ऑगस्ट 2021 पर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) द्वारे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना एकूण 6075.85 कोटी रुपये (केंद्रीय वाटा 50%) आधीच जारी केले गेले आहेत. राज्यनिहाय जारी करण्यात आलेला केंद्रीय वाटा आणि आजपर्यंतचा खर्च परिशिष्ट I मध्ये पाहता येईल.

वृत्तवाहिनीच्या अहवालात अनेक तथ्यात्मक त्रुटी आहेत.

केंद्र सरकारने प्रसारमाध्यमातील बातम्यांमध्ये केलेल्या दाव्यानुसार 26.14% नव्हे तर राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी राखून ठेवलेल्या निधीपैकी 50% निधी जारी केला आहे.

सर्व निधी बातमीत दावा केल्यानुसार नोव्हेंबर 2021 मध्ये नव्हे तर 24 ऑगस्ट 2021 पर्यंत जारी केला गेला.

केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या 6075.85 कोटी रुपये निधीपैकी, बातम्यांच्या अहवालात दावा केल्यानुसार 60% नव्हे तर 1679.05 कोटी रुपये, (म्हणजे 27.13%), राज्यांनी 31/12/21 पर्यंत खर्च केले आहेत.

उर्वरित निधी आधीच जारी केलेल्या किमान 50% निधीच्या प्रगती आणि वापराच्या आधारावर राज्यांना दिला जाईल. प्रत्यक्ष प्रगती आणि खर्च या दोन्हीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दैनंदिन निरीक्षण केले जात आहे.

Annexure I

ECRP-II Financial Progress (Source: NHM-PMS Portal) (As on 3rd January 2022)

S. No.

Name of the State / UT

Amount Approved
(Rs. In Crore)

Funds Available with State/UT
(Rs. In Crore)

Expenditure
(Rs. In Crore)

% Expenditure

 State Share Released to SHS (Y/N)

1

2

3

4

5

6=5/4

8

1

Andaman & Nicobar Islands

14.23

7.11

0.00

0.00%

 NA

2

Andhra Pradesh

662.09

348.26

66.88

19.20%

 Y

3

Arunachal Pradesh

118.50

70.97

1.16

1.64%

 Y

4

Assam

657.03

387.48

1.47

0.38%

 Y

5

Bihar

1,368.70

860.72

160.62

18.66%

 Y

6

Chandigarh

5.68

2.84

0.79

27.77%

 NA

7

Chhattisgarh

626.60

188.03

25.65

13.64%

 N

8

DNH & DD

9.38

4.76

0.82

17.17%

 NA

9

Delhi

50.34

25.17

34.92

138.74%

 Y

10

Goa

17.51

9.82

0.03

0.35%

 Y

11

Gujarat

661.99

323.98

78.94

24.37%

 Y

12

Haryana

272.71

152.02

91.41

60.13%

 Y

13

Himachal Pradesh

203.87

120.29

11.95

9.94%

 Y

14

Jammu & Kashmir

211.04

128.82

3.14

2.44%

 NA

15

Jharkhand

569.81

319.45

0.00

0.00%

 Y

16

Karnataka

831.80

420.03

2.57

0.61%

 Y

17

Kerala

267.35

144.90

30.20

20.84%

 Y

18

Ladakh

34.51

31.26

2.32

7.41%

 NA

19

Lakshadweep

1.50

0.50

0.00

0.00%

 NA

20

Madhya Pradesh

1,447.51

728.62

192.39

26.40%

 Y

21

Maharashtra

1,294.69

683.98

2.22

0.32%

 Y

22

Manipur

78.07

38.67

3.00

7.76%

 N 

23

Meghalaya

79.65

42.37

1.42

3.34%

 Y

24

Mizoram

44.30

1.66

0.00

0.00%

 N 

25

Nagaland

62.46

28.11

0.00

0.00%

 N 

26

Odisha

807.33

430.98

55.09

12.78%

 Y

27

Puducherry

7.18

4.52

0.84

18.52%

 Y

28

Punjab

330.94

165.73

144.93

87.45%

 Y

29

Rajasthan

1,472.28

708.33

34.00

4.80%

 Y

30

Sikkim

18.80

9.98

0.00

0.00%

 Y

31

Tamil Nadu

798.94

399.66

325.58

81.46%

 Y

32

Telangana

456.08

229.34

42.83

18.68%

 Y

33

Tripura

87.33

46.51

0.60

1.29%

 Y

34

Uttar Pradesh

2,690.07

939.94

87.05

9.26%

 N 

35

Uttarakhand

254.78

135.86

8.54

6.28%

 Y

36

West Bengal

983.97

503.82

267.69

53.13%

 Y

 

TOTAL

17,499.00

8,644.49

1,679.05

19.42%

 

Jaydevi PS/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1787532) Visitor Counter : 155