आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणांतर्गत आतापर्यन्त 146.70 कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या


गेल्या 24 तासात लसीच्या जवळपास 1 कोटी मात्रा देण्यात आल्या.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.13 %

गेल्या 24 तासात 37, 379 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 1,71,830

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.05%

Posted On: 04 JAN 2022 10:13AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालांनुसार भारतातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अंतर्गत गेल्या 24 तासांत लसीच्या  जवळपास  1 कोटी (99,27,797)  मात्रा देण्यात आल्या असून आतापर्यन्त एकूण 146 कोटी 70  लाख (146,70,18,464) मात्रा देण्यात आल्या आहेत. 1,57,38,732 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:

 

HCWs

1st Dose

103,88,236

2nd Dose

97,21,229

 

FLWs

1st Dose

183,86,265

2nd Dose

169,16,589

Age Group 15-18 years

1st Dose

42,06,433

 

Age Group 18-44 years

1st Dose

50,31,39,868

2nd Dose

33,88,64,854

 

Age Group 45-59 years

1st Dose

19,50,66,883

2nd Dose

15,24,39,814

 

Over 60 years

1st Dose

12,17,14,067

2nd Dose

96,17,4226

Total

146,70,18,464

 

गेल्या 24 तासांत 11,007  रुग्ण बरे झाल्यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्येत (महामारीच्या आरंभापासून ) वाढ होऊन ती संख्या 3,43,06,414 झाली आहे.

परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.13 % इतका आहे.

केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि एकत्रित प्रयत्नांमुळे गेल्या 190  दिवसांपासून दररोज 50,000 पेक्षा कमी नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे.

गेल्या 24 तासात 37,379  नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली.

भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 1,71,830 आहे. देशात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.49 % आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे.गेल्या 24 तासात एकूण 11,54,302 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आत्तापर्यंत एकूण 68.24 कोटींपेक्षा जास्त (68,24,28,595 ) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवली जात असताना, देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.05 % आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.24 % इतका नोंदविण्यात आला आहे.

***

MC/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1787358) Visitor Counter : 196