गृह मंत्रालय

उच्चस्तरीय सुरक्षाविषयक बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशाला असलेले संभाव्य धोके आणि सुरक्षाविषयक आव्हानांचा घेतला आढावा


दहशतवाद आणि जागतिक दहशतवादी संघटनांकडून असणारे धोके, दहशतवाद्यांना मिळणारे आर्थिक पाठबळ, अंमली पदार्थ विषयक दहशतवाद, संघटित गुन्हेगारी-दहशतवाद यातील संबंध, सायबर स्पेसचा गैरवापर आणि परदेशी दहशतवाद्यांच्या हालचाली या सगळ्याचा सामना करण्यासाठी केंद्रीय आणि राज्यातील सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय वाढवण्याची गरज – गृहमंत्री

Posted On: 03 JAN 2022 9:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 जानेवारी 2022

 

देशाला असलेले संभाव्य धोके आणि सुरक्षाविषयक आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीने देशाच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय सुरक्षाविषयक बैठक घेतली. या बैठकीला, देशातील सर्व सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांचे, विशेषतः केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.यात, सीएपीएफ, लष्करी दलांच्या गुप्तचर शाखांचे प्रमुख, महसूल आणि वित्तीय तपास यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक देखील व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते.

दहशतवाद आणि जागतिक दहशतवादी संघटनांकडून देशाला सातत्याने असणारे धोके, दहशतवादी कृत्यांना मिळणारे आर्थिक पाठबळ, अंमली पदार्थ विषयक दहशतवाद, संघटित गुन्हेगारी-दहशतवाद यातील संबंध, सायबर स्पेसचा गैरवापर आणि परदेशी दहशतवाद्यांच्या हालचाली या सगळ्याचा सामना करण्यासाठी केंद्रीय आणि राज्यातील सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय वाढवण्याची गरज आहे, असे मत गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केले.

 

* * *

Jaydevi PS/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1787275) Visitor Counter : 201