केंद्रीय लोकसेवा आयोग
संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा, 2021 चे निकाल
Posted On:
03 JAN 2022 6:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जानेवारी 2022
21 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा, 2021 चे निकाल जाहीर झाले असून. खाली दिलेल्या आसन क्रमांकाच्या उमेदवारांची, मुलाखत/वैयक्तिक चाचणीसाठी निवड झाली आहे.
या सर्व उमेदवारांची निवड ही तात्पुरती असून, परीक्षेच्या संदर्भात असलेल्या सर्व आवश्यक निकषांवर उमेदवार पात्र ठरल्यानंतरच, ही निवड कायमस्वरूपी मानली जाईल. उमेदवारांना, त्यांची मुलाखत/ वैयक्तिक चाचणीच्या वेळी, आपली सर्व प्रमाणपत्रे, जसे की, वय/वयाची शिथिलता/ जन्मतारीख/ शैक्षणिक पात्रता, आरक्षण, दिव्यांग (आवश्यक असल्यास) चे प्रमाणपत्र, इत्यादीविषयक सत्य प्रमाणपत्रे सादर करावी लागतील.
संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा, 2021 बाबत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने 7 जुलै 2021 रोजीच्या राजपत्रात अधिसूचित केल्याप्रमाणे, सर्व उमेदवारांना सविस्तर आवेदन पत्र - DAF ऑनलाईन स्वरुपात भरावा लागेल. आयोगाचे संकेतस्थळ http://www.upsconline.nic.in; इथे चार जानेवारी 2022 पासून 18 जानेवारी 2022, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा फॉर्म उपलब्ध असेल.
हा फॉर्म भरण्याविषयी आणि ऑनलाईन भरण्याविषयीच्या महत्त्वाच्या सूचना देखील या संकेतस्थळावर वाचता येतील.
हा DAF फॉर्म भरण्याविषयीच्या सूचना आणि संयुक्त वैद्यकीय परीक्षांविषयीचे नियम, काळजीपूर्वक वाचने अपेक्षित असून, मुलाखतीच्या वेळी प्रत्यक्ष दिली जाणाऱ्या प्रमाणपत्रांची यादीही सविस्तर वाचून ते सादर करणे अपेक्षित आहेत.
व्यक्तिमत्व चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती/व्यक्तिमत्व चाचणीचे वेळापत्रक योग्य वेळेत आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड केले जाईल.
यासंदर्भातील अद्ययावत माहितीसाठी उमेदवारांना आयोगाच्या संकेतस्थळाला (https://www.upsc.gov.in) भेट देण्याची विनंती करण्यात आली आहे.
पात्र न ठरलेल्या उमेदवारांची गुणपत्रिका अंतिम निकालाच्या प्रकाशनानंतर (व्यक्तिमत्व चाचणी घेतल्यानंतर) आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड केली जाईल आणि 30 दिवस ती या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
उमेदवार त्यांचे आसन क्रमांक आणि जन्मतारीख टाकल्यानंतर गुणपत्रिका बघू शकतील .
संघ लोकसेवा आयोगाच्या परिसरामध्ये एक सुविधा विभाग आहे. या सुविधा केंद्रातून उमेदवार त्यांच्या परीक्षा/ निकालासंबंधी कोणतीही माहिती/स्पष्टीकरण कामाच्या दिवशी सकाळी 10.00 च्या दरम्यान मिळवू शकतात. या काउंटरवर संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत, वैयक्तिक किंवा दूरध्वनी क्रमांक (011) 23385271/23381125/23098543 वर संपर्क करु शकतात.
निकाल बघण्यासाठी इथे क्लिक करा
* * *
Jaydevi PS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1787190)
Visitor Counter : 187