संरक्षण मंत्रालय
सैन्य दिन संचलन 2022
प्रविष्टि तिथि:
03 JAN 2022 10:13AM by PIB Mumbai
येत्या 15 जानेवारी 2022 रोजी नवी दिल्ली येथील करिअप्पा मैदानावर सैन्य दिन संचलनाचे आयोजन होणार आहे. त्यासोबतच प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारे संचलन तसेच बिटींग द रिट्रीट सोहोळ्याबद्दल माध्यमांना माहिती देण्यासाठी 23 जानेवारी 2022 रोजी पत्रकार परिषद देखील घेण्यात येणार आहे. या परिषदेचे स्थळ नंतर जाहीर करण्यात येईल.
या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी माध्यम प्रतिनिधींनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळविण्यासाठी त्यांचे खालील तपशील 5 जानेवारी 2022 पर्यंत armydayparade2022[at]gmail[dot]com या संकेतस्थळावर पाठवावेत:-
-
संपूर्ण नाव
-
पत्रसूचना कार्यालयाने दिलेले ओळखपत्र अथवा इतर ओळखपत्र क्रमांक
-
ओळखपत्राचे स्कॅन केलेले छायाचित्र
-
माध्यम संस्थेचे नाव
-
अर्जदाराचे छायाचित्र
-
संचलन अथवा पत्रकार परिषद अथवा दोन्ही कार्यक्रम यापैकी कोणत्या कार्यक्रमासाठी अर्ज केला आहे त्याचा तपशील
या संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया 011-23019659 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. 05 जानेवारी 2022 नंतर येणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
*****
M.Iyengar/S.Chitnis/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1787065)
आगंतुक पटल : 268