आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19: मिथ्य  विरुद्ध तथ्य


भारताने लसीकरणाचे लक्ष्य न गाठल्याचा दावा करणारे माध्यमांचे अहवाल दिशाभूल करणारे आहेत

भारताचा राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण कार्यक्रम हा जगातील सर्वात यशस्वी आणि सर्वात विशाल लसीकरण कार्यक्रम आहे.

Posted On: 02 JAN 2022 4:46PM by PIB Mumbai

 

एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या वृत्तात, भारताने लसीकरणाचे लक्ष्य साध्य न केल्याचा दावा करण्यात आला आहे.  हे वृत्त  दिशाभूल करणारे आहे आणि सत्य  नाही.

16 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रीय कोविड लसीकरण मोहीमेचा आरंभ  झाल्यापासून भारताने पात्र नागरिकांना पहिल्या लसीच्या 90% आणि दुसऱ्या लसीच्या 65% पेक्षा जास्त मात्रा दिल्या आहेत.  या मोहिमेमध्ये, भारताने जगात अभूतपूर्व असे अनेक टप्पे गाठले आहेत, ज्यात 9 महिने इतक्या  कमी कालावधीत 100 कोटी मात्रा देणे, एकाच दिवसात 2.51 कोटी मात्रा देणे आणि अनेकदा, एकाच दिवशी 1 कोटी मात्रा देणे अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.

इतर विकसित राष्ट्रांच्या तुलनेत, भारताने कोविड लसीकरण करण्यात उत्तम कामगिरी बजावली असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 93.7 कोटी (RGI नुसार) पात्र प्रौढ नागरिकांचे  लसीकरण  करण्याचे  उत्तम कार्य केले आहे.

इतर  विकसित राष्ट्रांच्या लसीकरणाशी  तुलना खालीलप्रमाणे आहे:

Country

1st Dose

2nd Dose

USA

73.2%

61.5%

UK

75.9%

69.5%

France

78.3%

73.2%

Spain

84.7%

81%

India

90%

65%

 

पात्र लोकसंख्येला पहिली मात्रा देण्याच्या बाबतीत, यूएसएच्या  फक्त 73.2% लोकसंख्येचा समावेश होतो,, यूकेच्या  75.9% लोकसंख्येचा समावेश होतो, फ्रान्सच्या 78.3% लोकसंख्येचा समावेश होतो,आणि स्पेनच्या  84.7% लोकसंख्येचा समावेश केला आहे.  भारताने या सर्वांच्या आधीच पात्र लोकसंख्येपैकी 90% लोकांना कोविड-19 विरूद्ध लसीची पहिली मात्रा देण्यात उद्दिष्ट गाठले आहे.

त्याचप्रमाणे, लसींच्या दुसऱ्या मात्रेबाबत, यूएसएने आपल्या लोकसंख्येच्या केवळ 61.5%, यूकेने 69.5% लोकसंख्येचा, फ्रान्सने 73.2% लोकसंख्येचा आणि स्पेनने 81% लोकसंख्येचा समावेश केला आहे. परंतु  भारताने पात्र लोकसंख्येपैकी 65% पेक्षा जास्त लोकांना कोविड-19 विरुद्ध लसीची दुसरी मात्रा दिली आहे.

याव्यतिरिक्त भारतातील 11 पेक्षा जास्त राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी याआधीच 100%पात्र नागरिकांना लसीकरणाची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे, तर 3 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी आधीच कोविड-19 विरूद्ध 100% पूर्ण लसीकरण (पहिला आणि दुसरा डोस दोन्ही) साध्य केले आहे.  अनेक राज्ये/केंद्रशासित प्रदेश लवकरच 100% लसीकरण पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे.

3 नोव्हेंबर 2021 पासून देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहीमेत 'हर घर दस्तक' मोहीम राबविण्यात आली, ज्यामध्ये घराघरात जाऊन भेट देऊन ज्यांचे लसीकरण हुकले आहे किंवा राहून गेले आहे, अशा पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून एकत्रीकरण, जनजागृती करून लसीकरण मोहीम राबवली आहे. यामुळे मोहीम सुरू झाल्यापासून पहिली मात्रा देण्यात येण्याच्या  कामगिरीत  11.6% वाढ झाली आहे.  त्याच कालावधीत 2री मात्रा  देण्याचे  कार्य 28.9% वाढले.

कोविड-19 विरुद्धच्या  भारताच्या लढ्याला आणखी बळकटी देत, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (CDSCO) डिसेंबर 2021 मध्ये दोन अतिरिक्त लसींना मंजुरी दिली आहे. यामध्ये मर्यादीत  वापरासाठी बायलाॅजिकल ई-ची कोर्बेवॅक्स (Biological -E's CORBEVAX) लस आणि SII ची COVOVAX लस यांचा समावेश आहे.यामुळे आपत्कालीन परिस्थितीत, भारतात मर्यादीत  वापरासाठी असलेल्या लसींची संख्या ८ वर गेली आहे.

***

M.Chopade/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1786937) Visitor Counter : 311