आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 145.44 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात लसीच्या 25 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या.

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.27%

गेल्या 24 तासात 27,553 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 1,22,801

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.35%

Posted On: 02 JAN 2022 10:05AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालांनुसार भारतातील कोविड-19 लसीकरणाने गेल्या 24 तासांत लसीच्या 25,75,225 मात्रा देऊन,एकूण 145 कोटी 44 लाख(1,45,44,13,005) मात्रा देण्याचा टप्पा पार केला आहे.1,55,58,060 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे: 

 

HCWs

1st Dose

1,03,88,023

2nd Dose

97,16,435

 

FLWs

1st Dose

1,83,85,833

2nd Dose

1,69,05,442

 

Age Group 18-44 years

1st Dose

50,05,37,483

2nd Dose

33,52,31,221

 

Age Group 45-59 years

1st Dose

19,47,56,093

2nd Dose

15,13,53,034

 

Over 60 years

1st Dose

12,15,36,496

2nd Dose

9,56,02,945

Total

1,45,44,13,005

 

गेल्या 24 तासांत 9,249 रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्येत (महामारीच्या आरंभापासून ) वाढ होऊन ती संख्या 3,42,84,561 झाली आहे.

परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.27% इतका आहे.

केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि एकत्रित प्रयत्नांमुळे गेल्या 187 दिवसांपासून दररोज 50,000 पेक्षा कमी नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे.

गेल्या 24 तासात 27,553 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली.

भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 1,22,801 आहे.देशात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.35% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे.गेल्या 24 तासात एकूण 10,82,376 चाचण्या करण्यात आल्या.भारताने आतापर्यंत एकूण 68 कोटींपेक्षा जास्त (68,00,71,486) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवली जात असताना, देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.35% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.55%इतका नोंदविण्यात आला आहे.

 

***

MaheshC/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1786918) Visitor Counter : 120