गृह मंत्रालय
वर्ष 2022 च्या पहिल्याच दिवशी पीएम किसान योजनेअंतर्गत 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटी रुपये वर्ग केल्याबद्दल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती व्यक्त केली कृतज्ञता
प्रविष्टि तिथि:
01 JAN 2022 4:09PM by PIB Mumbai
वर्ष 2022 च्या पहिल्याच दिवशी पीएम किसान योजनेअंतर्गत 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटी रुपये वर्ग केल्याबद्दल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी ट्विट केले आहे की, “शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाशिवाय देशाचा सर्वांगीण विकास शक्य नाही आणि गेल्या सात वर्षांपासून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी अविरत प्रयत्न करत असलेले शेतकरी-अनुकूल मोदी सरकार देशाने अनुभवले आहे.”
ते म्हणाले की, “शेतकऱ्यांना शेतीच्या बिकट काळात आर्थिक पाठबळ देऊन त्यांना कर्जमुक्त ठेवण्यासाठी पीएम किसान योजनेने खूप चांगली कामगिरी केली आहे.”
***
M.Chopade/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1786828)
आगंतुक पटल : 248