दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेडने 2020-21 मध्ये 17492.90 दशलक्ष रुपये महसूल आणि 527.70 दशलक्ष रुपये करोत्तर नफ्याची कमाई केली


दूरसंचार विभागाला 211.10 दशलक्ष रुपये लाभांश दिला

Posted On: 31 DEC 2021 12:01PM by PIB Mumbai

टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेडचे  (TCIL) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार  यांनी  211.10 दशलक्ष रुपयांचा  लाभांश धनादेश  दूरसंचार विभागाचे सचिव आणि डीसीसीचे अध्यक्ष  के. राजारामन यांना सुपूर्द केला.


स्थापनेपासून, टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड ही सातत्याने  नफा मिळवणारी कंपनी आहे. टीसीआयएलने सरकारला त्याच्या सुरुवातीच्या समभागातील  ३० लाख रुपये  इतक्या गुंतवणुकीवर 2020-21 पर्यंत    2678.60 दशलक्ष रुपयांचा लाभांश दिला आहे. 2015-16 मध्ये आणखी 160 दशलक्ष रुपये गुंतवण्यात  आले. कंपनीचे एकत्रित आणि स्वतंत्रपणे  निव्वळ मूल्य  31 मार्च 2021 रोजी अनुक्रमे 9595.1 दशलक्ष आणि .6111 दशलक्ष रुपये होते.

2020-21 मध्ये, टीसीआयएलने अनुक्रमे 17,492.90 दशलक्ष आणि 527.70 दशलक्ष रुपये करोत्तर स्वतंत्र महसूल आणि नफा कमावला आहे.
टीसीआयएल ही ऑगस्ट, 1978 मध्ये दळणवळण मंत्रालयाच्या  दूरसंचार विभागाच्या अंतर्गत स्थापन झालेली   मिनी रत्न श्रेणी – I  कंपनी आहे . त्यात केंद्र सरकारचे 100% भाग भांडवल आहे. टीसीआयएल  ही प्रामुख्याने  अभियांत्रिकी आणि सल्लागार कंपनी आहे. टीसीआयएलचे  देशात  आणि परदेशात दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान आणि नागरी बांधकाम या सर्व क्षेत्रात प्रकल्प आहेत. टीसीआयएलने जगभरातील 70 पेक्षा अधिक  देशांमध्ये प्रकल्प राबवले  आहेत.

आफ्रिका ई-विद्या भारती आणि आरोग्य भारती नेटवर्क  या प्रकल्पांव्यतिरिक्त  कंपनीचे परदेशात कुवेत, सौदी अरेबिया, ओमान, मॉरिशस, नेपाळ सह  15 हून अधिक आफ्रिकन देशांमध्ये प्रकल्प आहेत आणि आणखी इतर  आफ्रिकन देशात व्यवसाय वाढवण्याची शक्यता आहे.

कंपनी केंद्र सरकारसाठी टपाल  विभाग, संरक्षण, नौदल OFC प्रकल्प, एपीएसएफएल , तेलंगणा फायबर, बीबीएनएल ,व्हीसॅट  आणि एकलव्य शाळेसाठी देखील माहिती तंत्रज्ञान संबंधित मोठे प्रकल्प राबवत आहे.

***

 

Jaydevi PS/ SK/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1786535) Visitor Counter : 160


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu