भूविज्ञान मंत्रालय

वर्ष अखेर आढावा - 2021: पृथ्वी विज्ञान मंत्रालय


खोल-सागरी स्त्रोतांचा शोध आणि उपयोग करण्यासाठी भारताची ‘डीप ओशन मिशन’ महत्त्वाकांक्षी योजना, त्याचबरोबर सरकारच्या नील अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी 4077 कोटीच्या अंदाजपत्रकाला सीसीईएची 16 जून, 2021 रोजी मान्यता

पृथ्वी विज्ञान मंत्रालय (स्वतंत्र कार्यभार) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जीतेंद्र सिंग यांनी दि. 05 नोव्हेंबर,2021 रोजी डीप ओशन मिशन अंतर्गत समुद्रयान, भारतीय मानव महासागर मोहिमेचा प्रारंभ केला

उष्णकटिबंधीय क्षेत्रामध्ये झालेली तौक्ते, यास, गुलाब आणि शाहीन या चक्रीवादळांविषयी अगदी अचूक आणि योग्यवेळी अंदाज व्यक्त केल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन संस्थांना आवश्यक असणारी सज्जता ठेवण्यास मदत मिळाली; त्यामुळे हजारो देशवासियांचे मौल्यवान जीव वाचू शकले

आगामी 12 तासांच्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी हाय रिझोल्यूशन रॅपिड रिफ्रेश (एचआरआरआर) मॉडेल विकसित केले

गोव्याच्या धृवीय आणि महासागर संशोधन राष्ट्रीय केंद्रातून (एनसीपीओआर)दि. 15 नोव्हेंबर, 2021 रोजी 41 व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेसाठी अंटार्क्टिकाकडे जाणा-या मोहिमेचा प्रारंभ

Posted On: 29 DEC 2021 8:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29  डिसेंबर 2021

कोविड-19 महामारीमुळे संपूर्ण मानवजातीसाठी 2021 हे वर्ष ही अनेक आव्हाने घेऊन आले. भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी 2021मध्ये पृथ्वी विज्ञान आणि यासंबंधित क्षेत्रांमध्ये अनेक उल्लेखनीय कामगिरी केली. भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी कठोर परिश्रम करून ते करीत असलेल्या अथक प्रयत्नांना जे यश आले आहे, त्याची निवडक माहिती, यशोगाथा खाली देण्यात आली आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या 2021 मधील प्रमुख यशोगाथा -

  • खोल-सागरी स्त्रोतांचा शोध आणि उपयोग करण्यासाठी भारताची ‘डीप ओशन मिशन’महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारच्या नील अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी 4077 कोटी रूपयांच्या अंदाजपत्रकीय तरतुदीला मंत्रिमंडळाच्या सीसीईएने दि. 16 जून, 2021रोजी मान्यता दिली. पृथ्वी विज्ञान मंत्रालय हे बहु-संस्थात्मक महत्वाकांक्षी अभियान राबविणारे नोडल मंत्रालय असणार आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे (स्वतंत्र कार्यभार) राज्यमंत्री डॉ. जीतेंद्र सिंग यांनी दि. 05 नोव्हेंबर, 2021 रोजी डीप ओशन मिशन अंतर्गत समुद्रयान, भारतीय मानव महासागर मोहिमेचा प्रारंभ केला.
  • ऑक्सिजन मिनीमम झोनची (ओएमझेड) ऐहिक आणि अवकाशीय परिवर्तनशीलता जाणून घेण्यासाठी या मोहिमेत विशेष भर देण्यात आला असून खोल महासागरामध्ये भौतिक आणि जैवरासायनिक मापदंडाचे निरीक्षण करण्यासाठी बंगालच्या उपसागरामध्ये दोन ग्लायडर तैनात करण्यात आले होते.
  • पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्यावतीने पृथ्वी प्रणाली विज्ञान डेटा पोर्टलचा (ईएसएसडीपी)(https://incois.gov.in/essdp)प्रारंभ दि.27 जुलै, 2021रोजी करण्यात आला. मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांअंतर्गत जमा केली माहिती तसेच देखरेख केलेल्या उपक्रमांचा सुमारे 1050 मेटा इतका डेटा नोंदविण्यात आला आहे. या माहितीच्या  डेटा केंद्रांना लिंक देण्यात आल्या आहेत.
  • उष्णकटिबंधीय क्षेत्रामध्ये झालेली तौक्ते, यास, गुलाब आणि शाहीन या चक्रीवादळांविषयी अगदी अचूक आणि योग्यवेळी अंदाज व्यक्त केल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन संस्थांना आवश्यक असणारी सज्जता ठेवण्यास मदत मिळाली; त्यामुळे हजारो देशवासियांचे मौल्यवान जीव वाचू शकले
  • उष्णकटिबंधीय क्षेत्रामध्ये होणारी चक्रीवादळे, अतिवृष्टी, धुके, उष्णतेची लाट, थंडीची लाट, गडगडाटासह होणारी वादळे यासारख्या गंभीर हवामानाविषयीचे अचूक अंदाज वर्तविण्यामध्ये लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत. सर्वसाधारणपणे गेल्या पाच वर्षांच्या (2011-2015) तुलनेमध्ये अलिकडच्या पाच वर्षांमध्ये (2016-2020) गंभीर हवामानाविषयी व्यक्त केलेल्या अंदाजाच्या अचूकतेमध्ये 20 ते 40 टक्के सुधारणा झाली आहे.
  • गडगडाटासह होणारा वादळी पाऊस आणि त्यासंबंधित हवामान घटनांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन ती हानी कमी करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने सुमारे 1,084 हवामान केंद्र आणि देशातल्या सर्व जिल्ह्यांसाठी दर तीन तासांनी ‘नाऊकास्ट’ हे प्रसिद्ध करण्यास प्रारंभ केला आहे. यासाठी रडार आणि उपग्रह डेटा तसेच जमिनीवर निरीक्षणावर आधारित तयार केलेल्या डेटाचा नियमित उपयोग केला जातो.
  • आयआयटीएमच्यावतीने राजधानी दिल्ली क्षेत्रासाठी प्रगत हवा गुणवत्ता व्यवस्थापनासाठी स्वदेशी बनावटीची निर्णय समर्थन प्रणाली (https://ews.tropmet.res.in/dss/)यशस्वीरित्या विकसित केली आहे. या कार्यप्रणालीचे दि. 18 ऑक्टोबर, 2021 रोजी पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. जीतेंद्र सिंग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
  • नॅशनल सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फोरकास्टिंग (एनसीएमआरडब्ल्यएफ) मधील डेटा आत्मसात करण्याची प्रणाली अधिक अद्ययावत करण्यात आली असून आता त्यामध्ये नवीन उपग्रह निरीक्षणे आत्मसात केली जाऊ शकतात.
  • आगामी 12 तासांसाठी अंदाज वर्तविण्यासाठी हाय रिझोल्यूशन रॅपिड रिफ्रेश (एचआरआरआर) मॉडेल विकसित करण्यात आले आहे. एचआरआरआर मॉडेलमुळे रडार डेटा एक तासाच्या अवधीमध्ये दर 10-15 मिनीटांनी आत्मसात केला जातो.
  • पृथ्वी प्रणानी विज्ञान क्षेत्रामध्ये बहु-विद्याशाखीय कार्यक्रमाव्दारे डोमेनचा विस्तार करण्यासाठी आयआयटीएम येथे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)/ मशिन लर्निंग (एमएल)/ डीप लर्निंग (डीएल) वर एक आभासी केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
  • रिसोर्स एक्सप्लोरेशन अँड इन्व्हेटोरायझेशन सिस्टीम (आरईआयएस) कार्यक्रमाअंतर्गत एफओआरव्ही सागर संपदा येथे भारतीय विशेष आर्थिक झोन (ईईझेड) मध्ये संकलित करण्यात आलेल्या नमुन्यांच्या वर्गीकरणाच्या अभ्यासामधून कठीण कवच असलेल्या जलचरांच्या नवीन बहुपेशीयसहा प्रजाती आणि खोल भागातल्या ईल जलचराच्या दोन प्रजाती सापडल्या आहेत.
  • आयएनसीओआयएस व्दारे एनआयओटी आणि पीएमईएल-एनओएए सह संयुक्तपणे विकसित करण्यात आलेले ओएमईआएल-एनओएए हिंद महासागर डेटा पोर्टल दि.9 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू करण्यात आले. या पोर्टलवर  डेटा प्रदर्शन आणि वितरणासाठी थेट प्रवेश मिळू शकतो तसेच हवामानशास्त्रीय आणि समुद्र शास्त्रीय डेटा संचाची मोठी सूची प्रदर्शित करणार आहे.
  • देशात असलेल्या विद्यमान राष्ट्रीय भूकंपविज्ञानाचे जाळे आता 150 स्थानकांपर्यंत बळकट करण्यात आले आहे. यामध्ये 35 नवीन भूकंपीय वेधशाळांना जोडण्यात आले आहे. यामुळे देशाच्या बहुतांश भागांमध्ये आता एमः3.0 किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेचा भूकंप झाल्यास शोध घेण्याची क्षमता सुधारली आहे.
  • महाराष्ट्रातल्या कोयना भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये वैज्ञानिक खोल खोदकाम प्रकल्पाअंतर्गत या भागामध्ये खोल-पाणी पाझरण्याचे पुरावे कोयना मिळाले आहेत, ‘बोअरहोल’च्या पथदर्शी प्रकल्पाच्या आधारे भौतिक आणि खडकांच्या निर्मितीचे यांत्रिक गुणधर्म लक्षात घेऊन धरणाच्या सभोवताली 2 ते 3 किलोमीटर परिघामध्ये नुकसान क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.
  • सबमरीन ग्राउंड वॉटर डिस्चार्ज (एसजीडी) या राष्ट्रीय प्रकल्पा अंतर्गत पृथ्वी विज्ञान अभ्यास राष्ट्रीय केंद्राने (एनसीईएसएस) भारताच्या नैऋत्य किनारपट्टीच्या तीन तटीय पाणलोट क्षेत्रांमध्ये जलचर मॉडेलिंग तंत्राच्या मदतीने एसजीडी प्रवाहाचा अंदाज लावला आहे.
  • अंटार्क्टिकाची 40 वी भारतीय वैज्ञानिक मोहीम  गोव्यातल्या मुरगाव येथून जानेवारी 2021 मध्ये सुरू झाली. एमव्ही व्हॅसिली गोलोव्हनिन या मोहिमेच्या जहाजावरील 43 भारतीय सदस्यांसह या मोहिमेला प्रारंभ झाला.
  • 41 व्या मोहिमेमध्ये दोन प्रमुख कार्यक्रम होणार आहेत. पहिल्या कार्यक्रमामध्ये भारती स्थानकावरील अमेरी बर्फाच्या थरांचे भूवैज्ञानिक अन्वेषण करणे समाविष्ट आहे. यामुळे भूतकाळामध्ये भारत आणि अंटार्क्टिका यांच्यासला दुवा शोधण्यास मदत मिळणार आहे.
  • आफ्रिकन -आशियाई- ऑस्ट्रेलियन मौसमी पावसाचे विश्लेषण आणि अंदाज (आरएएमए) आणि उत्तर भारतीय महासागरातील ‘ओशन मूर्ड ब्युओय नेटवर्क’’ (ओएमएनआय) याच्यासाठी संशोधन कार्यासाठी तांत्रिक सहकार्य तसेच हवामान आणि पावसाचा अंदाज सुधारण्यासाठी अंमलबजावणी करार करण्यात आला आहे. दि. 09 ऑगस्ट, 2021 रोजी झालेल्या आभासी कार्यक्रमामध्ये या करारावर स्वाक्षरी केल्या.
  • भारत आणि व्हिएतनाम यांच्या दरम्यान 17 डिसेंबर 2021 रोजी सागरी विज्ञान आाणि पर्यावरण क्षे़त्रातल्या वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या.
  • भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (आयआयएसएफ 2021) च्या सातव्या आवृत्तीचे गोवा राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने पृथ्वी विज्ञान मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि विज्ञान भारती यांच्यावतीने 10 ते 13 डिसेंबर 2021 या काळामध्ये गोव्यात आयोजन करण्यात आले.

Jaydevi PS/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1786343) Visitor Counter : 191