संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी आणि संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक कंपन्यांचे आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी उपकरण उप-प्रणाली/जोडण्या/ उप-जोडण्या/घटक यांच्या स्वदेशीकरणाची यादी संरक्षण मंत्रालयाने केली अधिसूचित

Posted On: 29 DEC 2021 3:38PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2021

 

संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच या क्षेत्रातील सार्वजनिक कंपन्यांचे आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील, संरक्षण उत्पादने विभागाने, शस्त्रास्त्र आणि उपकरणांच्या उप-प्रणाली/जोडण्या/ उप-जोडण्या/घटक यांचे  स्वदेशीकरण करण्याविषयीची  यादी अधिसूचित केली आहे. या यादीत,2500 अशी आयात  होणारी उत्पादने आहेत,ज्यांचे याआधीच स्वदेशीकरण झाले आहे, तसेच 351 विदेशी उत्पादने अशी आहेत, ज्यांची  पर्यायी स्वदेशी उत्पादने येत्या तीन वर्षात निर्माण केली जातील. या आत्मनिर्भर उपक्रमामुळे,  देशातल्या सुमारे 3,000 कोटी रुपये मूल्याच्या परकीय चलनाची दरवर्षी बचत होऊ शकेल.

ही सविस्तर यादी मंत्रालयाच्या सृजन पोर्टलवर उपलब्ध असून, त्याची लिंक खालीलप्रमाणे :

(https://srijandefence.gov.in/DPSU%20Indigenization%20List.pdf)

या यादीत दिलेल्या कालावधीनंतर, ही सगळी उपकरणे केवळ भारतीय कंपन्याच तयार करतील.

या आधी लष्करी व्यवहार विभागाने स्वदेशीकरण केली जाणारी शस्त्रे/प्लॅटफॉर्म/प्रणाली/दारुगोळा इत्यादींच्या दोन याद्या केल्या आहेत. याद्वारे, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत अभियानाला बळ दिले जात आहे.


* * *

M.Iyengar/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1786058) Visitor Counter : 269