आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 143.15 कोटीहून अधिक
गेल्या 24 तासात 64 लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या
भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.40%
देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 9,195 नवे रुग्ण
देशातील उपचाराधीन रुग्णसंख्या 77,002
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (0.68%) गेल्या 45
दिवसापासून 1 %पेक्षा कमी
Posted On:
29 DEC 2021 9:50AM by PIB Mumbai
भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या 64,61,321 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 143.15 कोटीपेक्षा जास्त (1,43,15,35,641) मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,52,69,126 सत्रांद्वारे मात्रा देण्यात आल्या आहेत.
यामध्ये यांचा समावेश आहे-
HCWs
|
1st Dose
|
1,03,87,197
|
2nd Dose
|
96,94,283
|
FLWs
|
1st Dose
|
1,83,85,217
|
2nd Dose
|
1,68,62,710
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
49,64,04,904
|
2nd Dose
|
32,31,01,947
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
19,38,12,980
|
2nd Dose
|
14,80,52,758
|
Over 60 years
|
1st Dose
|
12,09,96,702
|
2nd Dose
|
9,38,36,943
|
Total
|
1,43,15,35,641
|
गेल्या 24 तासात 7,347 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,42,51,292 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 98.40% झाला आहे.
सलग 62 दिवसांपासून 15,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
गेल्या 24 तासात 9,195 नव्या रुग्णांची नोंद झाली.
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 77,002 असून उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 0.22% असून मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.
देशभरात चाचण्या क्षमता व्यापक करण्यात येत असून देशात गेल्या 24 तासात 11,67,612 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 67.52 कोटीहून अधिक (67,52,46,143) चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर सध्या 0.68% असून गेले 45 दिवस 1% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 0.79% असून गेले 86 दिवस 2% पेक्षा कमी आणि 121 दिवस 3% पेक्षा कमी आहे.
***
ST/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1786000)
Visitor Counter : 256