गृह मंत्रालय
केंद्रीय गृह मंत्रालयाने मिशनरीज ऑफ चॅरिटीची(एमओसी) बँक खाती गोठवली नाहीत
मिशनरीज ऑफ चॅरिटीने स्वतःहून बँक खाती गोठवण्याची विनंती एसबीआयकडे पाठवल्याची स्टेट बँक ऑफ इंडियाची माहिती
एफसीआरए अंतर्गत एफसीआरए नोंदणीच्या नूतनीकरणाचा अर्ज अयोग्य माहितीमुळे फेटाळला
नूतनीकरणासाठी नकार देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याबाबत मिशनरीज ऑफ चॅरिटीकडून कोणतीही विनंती/ सुधारित अर्ज प्राप्त झालेला नाही
Posted On:
27 DEC 2021 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2021
परदेशी योगदान नियामक कायद्यांतर्गत(एफसीआरए) मिशनरीज ऑफ चॅरिटी(एमओसी) या संस्थेच्या एफसीआरए नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी केलेला नूतनीकरण अर्ज एफसीआरए 2010 आणि परदेशी योगदान नियामक नियम(एफसीआरआर) 2011 अंतर्गत पात्रता निकषांची पूर्तता न केल्यामुळे 25 डिसेंबर 2021 रोजी फेटाळण्यात आला. हा अर्ज फेटाळल्यानंतर त्याचा फेरविचार करण्यासाठी मिशनरीज ऑफ चॅरिटीकडून कोणतीही विनंती/ सुधारित अर्ज प्राप्त झालेला नाही.
मिशनरीज ऑफ चॅरिटी(एमओसी) या संस्थेची नोंदणी एफसीआरए अंतर्गत नोंदणी क्रमांक 147120001 नुसार झाली होती आणि ही नोंदणी 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत वैध होती. इतर एफसीआरए संस्थांच्या नूतनीकरणाचे अर्ज देखील प्रलंबित असल्याने त्यांच्यासोबत या वैधतेमध्ये 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढ करण्यात आली होती.
मात्र, एमओसीने नूतनीकरणासाठी केलेल्या अर्जाचा विचार करताना त्यामध्ये काही चुकीची माहिती निदर्शनास आली. पटलावरील या माहितीचा विचार करून एमओसीच्या नूतनीकरणाचा अर्ज मंजूर करण्यात आला नाही. या संस्थेची एफसीआरए नोंदणी 31 डिसेंबर 21 पर्यंत वैध होती. केंद्रीय गृह मंत्रालयाने एमओसीचे कोणतेही खाते गोठवलेले नाही. स्टेट बँक ऑफ इंडियाने असे कळवले आहे की एमओसीने स्वतःहून एसबीआयकडे आपली खाती गोठवण्याची विनंती पाठवली होती.
* * *
R.Aghor/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1785618)
Visitor Counter : 295