उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नाताळच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 24 DEC 2021 4:40PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी आज नाताळच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी मराठी आणि हिंदी भाषेतून दिलेले संदेश पुढीलप्रमाणे आहेत-

भगवान येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवानिमित्त, नाताळच्या या पवित्र प्रसंगी सर्व भारतीयांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

नाताळचा सण प्रेम, दयाभाव आणि क्षमाशीलतेच्या मूल्यांवरील आपली श्रद्धा बळकट करतो. भगवान ख्रिस्ताच्या जन्माचा उत्सव साजरा करत असताना, ते ज्या मूल्यांचे प्रतीक आहेत ती मूल्ये आपण साजरी करूया. आपल्यापेक्षा कमी नशीबवान असलेल्यांप्रती आपण अधिक  कनवाळू होऊया, आणि शांती, सहिष्णुता आणि एकोप्याच्या मजबूत पायावर अधिक उत्तम विश्वाची उभारणी करण्यासाठी आपल्यातील सर्वोत्तम गुणांना वाव देऊया.

हा नाताळ आपल्या जीवनात अमर्याद आनंद घेऊन येवो हीच सदिच्छा.

 

संदेश

"प्रभु ईसा मसीह के जन्मोत्सव, क्रिसमस के शुभ अवसर पर मैं सभी भारतवासियों को अपनी हार्दिक बधाई और शुभकामनाएं देता हूँ।

क्रिसमस का त्योहार प्रेम, दया और क्षमा के मूल्यों के प्रति हमारी आस्था की पुन: पुष्टि करता है। प्रभु ईसा मसीह के जन्मोत्सव के अवसर पर आइए हम उन मूल्यों को अपने जीवन में अपनाएं जिनके वे प्रतीक थे। आइए, हम कम भाग्यशाली लोगों के प्रति और अधिक दयालु बने तथा शांति, सहिष्णुता और समरसता की आधारशिला पर एक बेहतर विश्व के निर्माण के लिए अपना सर्वोत्तम प्रयास करें।

मै कामना करता हूं कि क्रिसमस का यह त्योहार हमारे जीवन में असीम खुशियां लाए।"

***

Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1784867) आगंतुक पटल : 261
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Tamil , Malayalam