मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशात आयव्हीएफ तंत्रज्ञानाने पहिले बानी वासरु जन्माला घालणाऱ्या आयव्हीएफ केंद्राला केंद्रीय मंत्री परशोत्तम रूपाला यांची भेट


आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, वासरांची पैदास करण्याच्या शाश्वत मॉडेल मधून उत्पन्न वाढीच्या अगणित संधी मिळतील- परशोत्तम रूपाला

Posted On: 24 DEC 2021 3:16PM by PIB Mumbai

 

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम  रूपाला यांनी आज पुण्यातीलजे. के. ट्रस्ट बोवेजिक्स या आयव्ही एफ केंद्राला भेट दिली. याच केंद्रात आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने, देशातील पहिल्या बानी जातीच्या वासराला जन्म देण्यात आला होता.

सहिवाल जातीच्या गाईपासून, मादी भ्रूण बाहेर काढण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष बघण्याची संधी मला मिळली होती अशी आठवण रूपाला यांनी यावेळी बोलतांना सांगितली. पशुधनात सहाय्यक पुनरुत्पादन तंत्रज्ञानासाठीच्या डॉ विजयपथ सिंघानिया उत्कृष्टता केंद्रात, ही वैज्ञानिक प्रक्रिया झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना त्यांनी तेथील  विविध उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केलं. मला, समाधीआणि गौरीया दोन  सहिवाल जातीच्या गाई, ज्यांनी 100 ते 125 बछड्याना जन्म दिला आहे, त्यांना भेटता आले. यापैकी प्रत्येक वासरू, सुमारे  एक लाखाला विकले गेले. म्हणजेच, मला हे ही सांगण्यात आले आहे, या दोन्ही गाईनी मिळून आतापर्यंत एका वर्षाच्या काळात सुमारे एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने, वासरांची पैदास करणाऱ्या या शाश्वत मॉडेलवर आणि या व्यवसायातून उत्पन्न वाढवण्याच्या विपुल संधीवर त्यांनी भर दिला.

जे. के. बोवा जेनिक्स हा जे. के. ट्रस्ट चा उपक्रम आहे. या ट्रस्टनेच, जनुकीयदृष्ट्या उत्तम असलेल्या गाई आणि म्हशींच्या जनुकांचे गुणन करण्यासाठीच्या आय व्हीएफ आणि ई टी तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे. यात, देशी जातींच्या पशूची पैदास करण्यावर विशेष भर दिला जात आहे.

***

Jaydevi PS/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1784828) Visitor Counter : 249