आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ.भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते राष्ट्रीय प्राणवायू स्टुअर्डशिप कार्यक्रमाचे (नॅशनल ऑक्सिजन स्टुअर्डशिप प्रोग्रामचे) उद्घाटन
या उपक्रमा अंतर्गत देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात "ऑक्सिजन स्टीवर्ड" ची नेमणूक आणि प्रशिक्षण
Posted On:
22 DEC 2021 2:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2021
वैद्यकीय प्राणवायूची जीवनरक्षक सार्वजनिक आरोग्य बाब म्हणून भूमिका आणि वैद्यकीय प्राणवायू हाताळण्यासाठी आरोग्य सेवा कर्मचार्यांची क्षमता वाढवण्याची गरज लक्षात घेऊन, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज नवी दिल्लीत एम्स इथे राष्ट्रीय प्राणवायू स्टुअर्डशिप कार्यक्रमाचे उद्घाटन केले. हा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा कार्यक्रम आहे.
प्राणवायू व्यवस्थापन आणि प्रशासनातील सर्व आरोग्यसेवा कर्मचार्यांना प्राणवायूचा तर्कसंगत वापर सुनिश्चित करण्यासाठी आणि त्याचा अपव्यय टाळण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांसह संबंधिताना सक्षम करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे, विशेषत: संसाधनांच्या मर्यादीत स्थितीमधे.
देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक "प्राणवायू स्टुअर्ड" ची नेमणे किंवा निश्चित करणे आणि त्यांना प्रशिक्षित करणे हा योजनेचा उद्देश आहे. हे प्रशिक्षित व्यावसायिक, संबंधित जिल्ह्यांमध्ये प्राणवायू उपचार आणि व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणाचे नेतृत्व करण्यासाठी जबाबदार असतील आणि मागणी वाढली असता अशा परिस्थितीत प्राणवायू वितरण तसेच सज्जतेच्या परिनिरीक्षणाला (ऑडिटला) देखील मदत करतील.
"प्राणवायू" हा जीव वाचवणारा असून केवळ कोविड-19च नव्हे तर अनेक आजारांवरील उपचारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. महामारीच्या काळात देशात प्राणवायूची मागणी वाढली आहे. त्यामुळे प्राणवायूचा तर्कसंगत वापर अनिवार्य आणि काळाची गरज बनला आहे असे असे याप्रसंगी संबोधित करताना डॉ. पवार म्हणाल्या.
प्राणवायूची वाढीव उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांची माहिती देताना, केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले की “भारत सरकारने 1500 पेक्षा जास्त प्रेशर स्विंग ऍडसॉर्प्शन (पीएसए) प्राणवायू निर्मिती संयंत्रांना मंजुरी दिली आहे, त्यापैकी 1463 कार्यान्वित करण्यात आले आहेत, ज्यामध्ये 1225 पीएसए प्रकल्प देशातील प्रत्येक जिल्ह्यात पीएमकेअर्स निधी अंतर्गत स्थापित आणि कार्यान्वित केले गेले आहेत.
नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य), डॉ. व्ही के पॉल यांनी प्राणवायू प्रशासनात कार्यक्षमता सुनिश्चित करण्यावर भर दिल्याबद्दल या उपक्रमाचे कौतुक केले.
त्यांनी अलीकडेच सुरु केलेल्या केलेल्या ‘ऑक्सीकेअर’ डॅशबोर्डला प्राणवायू प्रशासनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून अधोरेखित केले.
कोविड-19 महामारीमुळे वैद्यकीय प्राणवायूची मागणीच वाढली नाही तर ती वेळेवर पोहोचवण्याची गरज देखील वाढली आहे असे श्री राजेश भूषण, सचिव (आरोग्य) यांनी नमूद केले.
या कार्यशाळेचे उद्दिष्ट "विद्यमान मनुष्यबळाचा पुनर्उद्देश, पुनर्भिमुखता आणि कोशल्यउन्नती" हे आहे यावर त्यांनी भर दिला.
* * *
Jaydevi PS/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1784184)
Visitor Counter : 283