संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हीरक महोत्सवी गोवा मुक्तीदिन कार्यक्रमात भारतीय नौदलाचा सहभाग

प्रविष्टि तिथि: 20 DEC 2021 2:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 डिसेंबर 2021

 

गोवा हे राज्य दरवर्षी 19 डिसेंबरला मुक्ती दिन साजरा करते. गोवा मुक्तीची साठ वर्षे, हीरक महोत्सव साजरा करण्यासाठी पणजी इथे 19  डिसेंबर 2021 ला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझाद मैदानात शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी तीनही दलातल्या 100 जवानांनी मानवंदना दिली आणि बिगुल पथकाने ‘ द लास्ट पोस्ट’ वाजवली.

भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि नागरी संस्थांच्या बोटींच्या  परेडचे आणि मीरामार किनाऱ्यावर भारतीय नौदलाच्या फ्लायपास्टचे पंतप्रधानांनी अवलोकन केले.  

भारतीय नौदलाने व्हाईस अॅडमिरल, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, पश्चिम नौदल कमांड अजेन्द्र बहादूर सिंग  आणि रिअर अॅडमिरल फिलिपोस जी प्यनुमूटील, गोवा विभागाचे कमांडिंग फ्लॅग ऑफिसर यांच्या उपस्थितीत हीरक महोत्सवी कार्यक्रमांचे संयोजन केले.

 

* * *

Jaydevi PS/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1783399) आगंतुक पटल : 286
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Tamil , Telugu