आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 137.67 कोटीहून अधिक


गेल्या 24 तासात 15 लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.39%

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 6,563 नवे रुग्ण

देशातली उपचाराधीन रुग्णसंख्या (82,267) असून 572 दिवसातली सर्वात कमी संख्या

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (0.60%) गेल्या 36 दिवसापासून 1 %पेक्षा कमी

Posted On: 20 DEC 2021 9:47AM by PIB Mumbai

भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या  15,82,079 मात्रापात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण   137.67 कोटीपेक्षा जास्त  (1,37,67,20,359) मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,44,91,123 सत्रांद्वारे  मात्रा देण्यात आल्या  आहेत.

 यामध्ये यांचा समावेश आहे-

 

 

HCWs

1st Dose

1,03,86,261

2nd Dose

96,45,996

 

FLWs

1st Dose

1,83,83,973

2nd Dose

1,67,72,043

 

Age Group 18-44 years

1st Dose

48,68,79,459

2nd Dose

29,37,59,017

 

Age Group 45-59 years

1st Dose

19,15,95,978

2nd Dose

14,00,66,251

 

Over 60 years

1st Dose

11,97,15,150

2nd Dose

8,95,16,231

Total

1,37,67,20,359

 

गेल्या 24 तासात 8,077 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण  3,41,87,017 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. 

 कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर  98.39% झाला आहे.

 

सलग  53 दिवसांपासून  15,000  पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

 गेल्या 24 तासात 6,563 नव्या रुग्णांची नोंद झाली.

 

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या  82,267  असून  572  दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे. उपचाराधीन रुग्णएकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या  0.24% असून  मार्च 2020 पासून सर्वात  कमी आहे.

 

देशभरात चाचण्या क्षमता  व्यापक करण्यात येत असून देशात गेल्या 24 तासात 8,77,055  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 66.51  कोटीहून अधिक  (66,51,12,580)  चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 0.60%  असून गेले   36 दिवस  1% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 0.75%.  असून गेले 77  दिवस 2% पेक्षा कमी आणि  112  दिवस  3% पेक्षा कमी आहे.

 ***

JaydeviPS/NilimaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1783357) Visitor Counter : 208