नौवहन मंत्रालय
सोनोवाल यांनी मुरगाव पोर्ट ट्रस्ट गोवा येथे रिव्हर क्रूझ सेवेचे उद्घाटन केले
Posted On:
11 DEC 2021 9:20PM by PIB Mumbai
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज गोव्यातील मुरगाव बंदर येथे रिव्हर क्रूझ सेवांचे उद्घाटन केले. पर्यटकांना गोव्याची संस्कृती आणि इतिहासाचा परिपूर्ण अनुभव देण्यासाठी एफआरपी डबल डेक बोटीसह सर्व प्रस्तावित मार्गांवर ही सेवा त्वरित सुरू होईल, अशी घोषणा त्यांनी केली. ही एक सामान्य वापरकर्ता सुविधा असेल आणि कोणताही उद्योजक बंदरात उपलब्ध असलेल्या या बर्थिंग सुविधेतून नवीन आणि तत्सम प्रकारची सेवा सुरू करू शकतो. नदी आणि बेट क्रुझिंगमधील नवीन उपक्रम शोधण्याची गोव्यातील ही संधी आहे, जिचा आतापर्यंत वापर करण्यात आलेला नाही आणि गोव्यात अशा प्रकारचा नवीन अनुभव घेण्याची ही एक अनोखी संधी असेल.
सोनोवाल यांनी बंदरातील क्रूझ टर्मिनल बर्थला भेट दिली जेथे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रूझ टर्मिनल उभारले जाणे प्रस्तावित आहे. साउथ वेस्ट पोर्ट लिमिटेड (SWPL) आणि अदानी मुरगाव पोर्ट ट्रस्ट प्रा. लि. (AMPTPL)द्वारा परिचालित पीपीपी टर्मिनल्सच्या कामकाजाची त्यांनी पाहणी केली.
त्यांनी संबंधित आणि स्थानिक कार्यकर्त्यांसोबत एक बैठक देखील घेतली ज्यामुळे त्यांना थेट मंत्र्यांशी संवाद साधण्याची आणि भारताच्या वाढत्या सागरी क्षेत्राबद्दल , किनारपट्टीवरील वाहतूक प्रभावी मार्गाने सुधारण्याची आणि सागरी धोरणे कशा प्रकारे योगदान देऊ शकतात. याबद्दल आपली मते सामायिक करण्याची संधी मिळाली. सोनोवाल यांनी बंदरात कार्यरत संघटना आणि महासंघांशी चर्चा करून त्यांच्या समस्या आणि एमपीटीच्या वाढीसाठी सूचना जाणून घेतल्या.
मुरगाव बंदर, 32 वर्षे जुने बंदर असून देशाच्या सेवेसाठी वाढत्या व्यापाराच्या मागणीची पूर्तता करत हळूहळू विस्तारत आहे.
***
S.Patil/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1780561)
Visitor Counter : 279