आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 132 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात 76 लाख मात्रांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.36%; मार्च 2020 पासून सर्वाधिक

गेल्या 24 तासात 7,992 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या (93,277) गेल्या 559 दिवसातील सर्वात कमी संख्या

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.71%) गेले 27 दिवस 1% पेक्षा कमी

Posted On: 11 DEC 2021 9:47AM by PIB Mumbai

गेल्या 24 तासात 76,36,569 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने भारताने 131.99   (1,31,99,92,482) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, 1,37,65,868  लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

HCWs

1st Dose

1,03,85,461

2nd Dose

95,90,079

 

FLWs

1st Dose

1,83,82,742

2nd Dose

1,66,70,863

 

Age Group 18-44 years

1st Dose

47,60,97,427

2nd Dose

26,46,61,544

 

Age Group 45-59 years

1st Dose

18,89,84,691

2nd Dose

13,18,87,926

 

Over 60 years

1st Dose

11,81,93,905

2nd Dose

8,51,37,844

Total

1,31,99,92,482

 


गेल्या 24 तासांत 9,265 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 3,41,14,331 झाली आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.36% झाला आहे. मार्च 2020 पासूनचा हा सर्वाधिक दर आहे.

केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून गेल्या सलग 44 दिवसांपासून नव्या बाधितांची दैनंदिन संख्या 15,000 पेक्षा कमी राहण्याचा कल कायम राहिला आहे

गेल्या 24 तासात 7,992 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 93,277 आहे.  गेल्या 559 दिवसातील ही सर्वात कमी संख्या आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.27% आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण  ल 12,50,672 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 65.46   (65,46,27,300) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

 

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.71% असून गेल्या  27 दिवसांपासून हा दर 1% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.64% असून गेले 68 दिवस हा दर 2% पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 103 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे.

***

ST/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1780424) Visitor Counter : 270