दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: 75 लाख पोस्टकार्ड मोहीम
भारतीय टपाल विभागाच्या वतीने 01 ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत '75 लाख पोस्ट कार्ड मोहीम' आयोजित
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून या मोहिमेचे आयोजन
सर्व शाळांचे (सीबीएससी आणि राज्य शिक्षण मंडळे) इयत्ता चौथी ते बारावीचे विद्यार्थी पंतप्रधानांना पत्र लिहिणार
17 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या समारोप कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावरील सहभागासाठी अखिल भारतीय स्तरावर सर्वोत्कृष्ट कल्पना असलेली 75 पोस्ट कार्ड्स निवडणार
Posted On:
08 DEC 2021 7:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2021
भारत स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या स्मरणोत्सवाचा एक भाग म्हणून, भारत सरकारच्या वतीने आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत भारतीयांचा गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि कर्तृत्व जाणून घेण्याची संधी देण्यासाठी कार्यक्रमांची मालिका आखण्यात आली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (एकेएएम), हे स्वातंत्र्य सैनिक आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळींना अर्पण केलेली आदरांजली आहे.
दळणवळण मंत्रालयाचा टपाल विभाग, शिक्षण मंत्रालयाचा शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं 01 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत ‘75 लाख पोस्ट कार्ड मोहीम’ आयोजित केली आहे. ही मोहीम भारत आणि परदेशात स्थापन तसेच सीबीएससी आणि केंद्रशासित प्रदेशांसह विविध राज्य शिक्षण मंडळांशी संलग्न असलेल्या शाळांमधील चौथी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.
या मोहिमेअंतर्गत, 50 पैशांच्या नाममात्र किमतीत पोस्ट कार्ड खरेदी केले जाऊ शकते , यासाठी शाळा विद्यार्थ्यांसाठी पोस्ट कार्डची व्यवस्था करण्यासाठी स्थानिक टपाल अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत. टपाल विभाग प्रत्येक पोस्ट कार्डवर रबर-स्टॅम्प केलेला पत्ता टाकून साउथ ब्लॉक, नवी दिल्ली-110011 येथे भारताच्या पंतप्रधानांना पाठवत आहे.प्रत्येक शाळा सर्वोत्कृष्ट कल्पना असलेल्या 10 पोस्ट कार्डांची यादी करेल आणि ती सीबीएससीशी संलग्न शाळांद्वारे सीबीएससी पोर्टलवर आणि सीबीएस नसलेल्या शाळांद्वारे MyGov पोर्टलवर अपलोड केली जातील.17 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या अंतिम कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावरील सहभागासाठी अखिल भारतीय स्तरावर सीबीएससी मुख्यालयाद्वारे सर्वोत्तम कल्पना असलेली 75 पोस्ट कार्ड्स निवडली जातील.
आजपर्यंत या मोहिमेदरम्यान संपूर्ण भारतातील टपाल कार्यालयांद्वारे 50 लाखांहून अधिक पोस्ट कार्डची विक्री करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त टपाल विभागातील नोडल अधिकाऱ्यांनी 70 हजार शाळांशी संपर्क साधला आहे आणि सुमारे सात हजार शाळांच्या सहभागासह 4.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी यापूर्वीच पोस्ट कार्डे लिहिली आहेत.


S.Bedekar/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1779438)