आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 प्रतिबंधक लसींची निर्यात
Posted On:
07 DEC 2021 4:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2021
कोविड-19 महामारीच्या सुरुवातीपासूनच भारताने 150 हून अधिक देशांना कोविड-19 संबंधित वैद्यकीय आणि अन्य मदत पुरवली आहे.
जानेवारी 2021 मध्ये लस मैत्री कार्यक्रम सुरू झाल्यापासून, 29 नोव्हेंबर 2021 पर्यंत भारताने सहाय्य, व्यावसायिक निर्यात किंवा कोव्हॅक्स (COVAX) या जगातील लस वितरण कार्यक्रमाच्या माध्यमातून 94 देशांना आणि 2 संयुक्त राष्ट्र संस्थांना कोविड प्रतिबंधक लसींच्या 723.435 लाख मात्रांचा पुरवठा केला आहे.
कोविड-19 महामारी विरुद्धच्या लढ्यात दुसऱ्या लाटेदरम्यान ,कोविड उपचाराशी संबंधित उपकरणे आणि औषधांच्या स्वरूपात ५० हून अधिक देशांकडून मदत प्राप्त झाली. यामध्ये परदेशी सरकारे , खाजगी कंपन्या, परदेशातील भारतीय संघटना इत्यादींचा समावेश होता.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
M.Chopade/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1778876)
Visitor Counter : 268