भारतीय निवडणूक आयोग

माजी मुख्य निवडणूक आयुक्त श्री सुनील अरोरा इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टंट (आयडीईए) च्या सल्लागार मंडळात

Posted On: 07 DEC 2021 4:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2021

भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त श्री सुनील अरोरा यांना इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टंट (आयडीईए) च्या सल्लागार मंडळात सामील होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. श्री सुनील अरोरा यांच्याकडे समृद्ध नेतृत्व, ज्ञान आणि कौशल्ये यांचा दांडगा अनुभव असून आंतरराष्ट्रीय संस्थेच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी तो उपयोगी ठरेल.  संस्थेला 15-सदस्यीय सल्लागार मंडळाद्वारे सहाय्य केले जाते जे विविध पार्श्वभूमी असलेले प्रख्यात व्यक्ती किंवा तज्ञ आहेत.

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स (आंतरराष्ट्रीय आयडीईए), 1995 मध्ये स्थापन झालेली, स्टॉकहोम, स्वीडन येथे मुख्यालय असलेली एक आंतरशासकीय संस्था आहे. जगभरात शाश्वत लोकशाहीला समर्थन देणे हे तिचे  ध्येय आहे.  आंतरराष्ट्रीय आयडीईए मध्ये सध्या 34 सदस्य देश आहेत ज्यात सर्व खंडातील मोठ्या आणि लहान, जुन्या आणि नवीन लोकशाहीचा समावेश आहे.  भारत हा आयडीईएच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे.

श्री सुनील अरोरा हे 2 डिसेंबर 2018 ते 12 एप्रिल 2021 पर्यंत भारताचे 23 वे मुख्य निवडणूक आयुक्त होते. भारतीय निवडणूक आयोगामधील त्यांच्या 42 महिन्यांहून अधिकच्या कार्यकाळात, आयोगाने 2019 मधे 17 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्या. तसेच 24 राज्यांमधे विधानसभा निवडणुका आणि पोटनिवडणुका तसेच द्विवार्षिक निवडणुकाही झाल्या.

निवडणूक व्यवस्थापन संस्थांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण करून जगभरातील लोकशाही मजबूत आणि भक्कम करण्यावर भारतीय निवडणूक आयोगाचा ठाम विश्वास आहे.  श्री अरोरा यांच्या कार्यकाळात असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (एडब्लूईबी) आणि फोरम ऑफ द इलेक्शन मॅनेजमेंट बॉडीज ऑफ साउथ एशियाचे (एफईएमबीओएसए) अध्यक्ष म्हणून काम करत असताना, भारतीय निवडणूक आयोगाने क्षमता बांधणीत आणखी वाढ सुनिश्चित केली.

 

 

 

 

 

M.Chopade/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1778873) Visitor Counter : 165