पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या लसीकरण मोहिमेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

Posted On: 06 DEC 2021 10:35AM by PIB Mumbai

भारताच्या लसीकरण मोहिमेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. भारतातील पात्र लोकसंख्येपैकी 50% पेक्षा जास्त लोकांचे आता पूर्णपणे लसीकरण झाले आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

"भारताच्या लसीकरण मोहिमेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. कोविड-19 विरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी ही गती कायम ठेवणे महत्त्वाचे आहे.

आणि हो, मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतर राखण्यासह इतर सर्व कोविड -19 संबंधित नियमांचे पालन करत रहा."

***


ST/Vinayak/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1778365) Visitor Counter : 219