ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

31वे राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार आणि पहिला  राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता अभिनवता पुरस्कार बीईईकडून जाहीर


स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमाचा  एक भाग म्हणून, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवशी पुरस्कार प्रदान सोहळा

Posted On: 04 DEC 2021 3:22PM by PIB Mumbai

 

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली ऊर्जा कार्यक्षमता विभाग (बीईई), ऊर्जेचा  वापर कमी करणारी औद्योगिक एकके , संस्था आणि आस्थापनांच्या प्रयत्नांना, दरवर्षी 14 डिसेंबरला  राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देते. याबरोबरच यंदा राष्ट्रीय कार्यक्षमता अभिनवता पुरस्कारही दिला जाणार आहे.

यावर्षी, "स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव" कार्यक्रमाअंतर्गत या  पुरस्कारांचे  आयोजन केले जात आहे. 14 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार आणि राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता अभिनवता पुरस्कार विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल. 

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार भारतीय अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांतील ऊर्जेचा मोठा वापर असलेल्या एककांना  विशिष्ट ऊर्जा वापर कमी करण्याच्या त्यांच्या उल्लेखनीय  कामगिरीबद्दल दिले जातात .

यावर्षी, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्काराबरोबरच ऊर्जा मंत्रालयाने राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता अभिनवता  पुरस्कारदेखील सुरू केला आहे. ऊर्जा बचतीसाठी अभिनव तंत्रज्ञान शोधणे  आणि उद्योग व विविध  क्षेत्रांना त्यांच्या एककांमध्ये अभिनव  ऊर्जा कार्यक्षमता प्रयत्न विकसित करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी स्पर्धेची भावना निर्माण करणे, हा यामागचा उद्देश आहे.  नवीन तंत्रज्ञान, कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मोठ्या गटांद्वारे या नवकल्पनांचा अवलंब करण्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी ऊर्जा कार्यक्षमता अभिनवता पुरस्कार ही काळाची गरज आहे.

यामुळे हवामानविषयक व्यापक उद्दिष्टे आणि भारताचे राष्ट्रीय स्तरावरील निश्चित योगदान यांची पूर्तता करण्यास हातभार लावला जाईल.

***

R.Aghor/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1778003) Visitor Counter : 334