पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ लिमिटेडने नवीकरणीय, ईएसजी प्रकल्पांच्या विकासासाठी भारतीय सौर ऊर्जा महामंडळाबरोबर सामंजस्य करार केला

Posted On: 03 DEC 2021 2:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2021

हरित ऊर्जा उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ लिमिटेडने  (ONGC) भारतीय सौर ऊर्जा महामंडळाबरोबर (SECI)सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारावर ओएनजीसीचे मुख्य व्यवस्थापकीय  संचालक  सुभाष कुमार आणि भारतीय सौर ऊर्जा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुमन शर्मा यांनी, 2 डिसेंबर 2021 रोजी नवी दिल्ली येथे दोन राष्ट्रीय ऊर्जा कंपन्यांच्या वतीने स्वाक्षरी केली. हा सामंजस्य करार ओएनजीसी आणि एसईसीआयसाठी सौर, पवन, सौर पार्क, इव्ही  व्हॅल्यू चेन, ग्रीन हायड्रोजन, साठवणूक  यासह नवीकरणीय  ऊर्जा प्रकल्प हाती घेण्यासाठी सहयोग आणि सहकार्य करण्यासाठी एक व्यापक चौकट  प्रदान करतो.

या भागीदारीमुळे ओएनजीसीला नवीकरणीय ऊर्जा, विशेषत: सौरऊर्जेमध्‍ये आपला ठसा बळकट करण्‍यात मदत होईल.यावेळी बोलताना सुभाष कुमार म्हणाले: "आम्ही हवामान बदलाच्या आव्हानाची तीव्रता आणि तातडीची गरज जाणून आहोत .  त्याचबरोबर देशाच्या ऊर्जा सुरक्षेप्रति  आमची वचनबद्धता देखील जाणतो  आणि आमचा उद्योग शाश्वत पद्धतीने करण्यासाठी वचनबद्ध आहोत."

सुमन शर्मा म्हणाल्या: "एसईसीआयला ओएनजीसी सोबत या नाविन्यपूर्ण  उपक्रमात सहभागी होताना आनंद होत आहे. यामुळे शाश्वत विकासाच्या नवीन संधी खुल्या   होतील आणि भारत तंत्रज्ञान आणि व्याप्तीची  नवीन शिखरे गाठेल.

ओएनजीसी या भारतातील आघाडीच्या तेल आणि वायू कंपनीने 2040 पर्यंत किमान 10 गिगावॅट नवीकरणीय  उर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले असून मुख्य ई अँड पी (E&P) व्यवसायावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.

ग्लोबल मिथेन इनिशिएटिव्ह (GMI)चा भाग असलेली ओएनजीसी ही पहिली बिगर -अमेरिकन कंपनी आहे. केवळ या कार्यक्रमाद्वारे, ओएनजीसी आतापर्यंत पर्यावरणाचे रक्षण करत अंदाजे 3 लाख टन कार्बन डायऑक्साइड एवढी म्हणजेच सुमारे 20.48 MMSCM मिथेन वायूची गळती रोखू शकला  आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1777618) Visitor Counter : 234