PIB Backgrounder
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 30 NOV 2021 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 30नोव्हेंबर 2021

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 78,80,545  मात्रा देण्यात आल्यामुळे, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांच्या संख्येने 123.25कोटी मात्रांचा  (1,23,25,02,767) टप्पा  पार केला  आहे. देशभरात 1,28,09,178  सत्रांच्या आयोजनातून हे लसीकरण करण्यात आले.

गेल्या 24 तासांत 10,116   रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात (महामारीची  सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 3,40,18,299 झाली आहे.

परिणामी, सध्या, भारतातील रोगमुक्ती दर 98.35%. आहे.

केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांमुळे, गेले सलग  156  दिवस  नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 हून कमी असण्याचा कल कायम आहे.

गेल्या 24 तासांत,6,990 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

देशातील  कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 1,00,543 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.29% आहे. मार्च 2020 पासून ही  सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्या क्षमता विस्ताराचे काम जारी आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 10,12,523  चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 64 कोटी 13  लाखांहून अधिक (64,13,03,848)  चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढवली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.84% असून गेले 16 दिवस हा दर 1% हून कमी राहिला आहे. तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज  0.69% आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 57 दिवस 2% हून कमी आहे आणि आता गेले सलग  92 दिवस हा दर 3 % हून कमी राहिला आहे.

इतर अपडेट्‌स :-

 

 

S.Patil/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1776613) अभ्यागत कक्ष : 236