मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग 26 नोव्हेंबर 2021 रोजी "राष्ट्रीय दुग्ध दिवस" साजरा करणार


‘आयकॉनिक वीक’- विभागातर्फे आठवडाभर चालणाऱ्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा समारोप राष्ट्रीय दुग्ध दिन साजरा करुन होईल


केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला याप्रसंगी राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार प्रदान करतील


गुजरात आणि कर्नाटक येथेही आयव्हीएफ प्रयोगशाळा सुरू केल्या जातील

Posted On: 25 NOV 2021 2:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2021

 

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग  उदया म्हणजेच, 26.11.2021 रोजी डॉ. वर्गीस कुरियन (भारताचे मिल्क मॅन) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त "राष्ट्रीय दूध दिवस" साजरा करणार आहे. हा कार्यक्रम टी के पटेल सभागृह, राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळ प्रांगण, आणंद, गुजरात इथे सकाळी 10:00 ते दुपारी 2.00 पर्यंत होणार आहे.  हा कार्यक्रम राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ आणि डॉ. कुरियन यांनी उभारलेल्या इतर संस्थांसोबत विभागातर्फे संयुक्तपणे आयोजित केला जाईल.

‘आयकॉनिक वीक’- विभागातर्फे आठवडाभर चालणाऱ्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा समारोप, राष्ट्रीय दूध दिन साजरा करुन होईल.

केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम रुपाला यांच्या हस्ते देशी गायी/म्हशींचे पालन करणारे सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी, सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ आणि सर्वोत्कृष्ट दूध सहकारी संस्था (डिसीएस)/ दूध उत्पादक संस्था/ देशातील दूध उत्पादक शेतकरी संघटना  या पुरस्कार  विजेत्यांना ‘राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार’ या समारंभादरम्यान प्रदान केला जाईल. 

प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार विजेत्यांच्या सत्कारासोबतच, परशोत्तम रुपाला धामरोड, गुजरात आणि हेसरगट्टा, कर्नाटक तसेच नवउद्यमी भव्य स्पर्धा 2.0 (स्टार्ट-अप ग्रँड चॅलेंज 2.0) येथे आयव्हीएफ प्रयोगशाळेचे उद्‌घाटनही करतील.

 

 

 

 

 

R.Aghor/V.Ghode/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1774979) Visitor Counter : 347