रेल्वे मंत्रालय
रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी ‘भारत गौरव ट्रेन’ सुरू करण्याची केली घोषणा
Posted On:
23 NOV 2021 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2021
रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी आज पर्यटक सर्किट ट्रेन्स संकल्पना आधारित भारत गौरव रेल्वेगाड्या (ट्रेन्स) सुरू करण्याची घोषणा केली. या रेल्वेगाड्या भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भव्य ऐतिहासिक ठिकाणे भारतातील आणि जगातील पर्यटकांना दाखवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृष्टी साकार करण्यास मदत करतील असे पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले.
पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांच्या मुख्य क्षमतांचा फायदा पर्यटन सर्किट ओळख पटवण्यासाठी, विकसित करण्यासाठी आणि भारताच्या विशाल पर्यटन क्षमतेचा फायदा करून घेण्यासाठी संकल्पना-आधारित ट्रेन चालवून केला जाईल असे ते म्हणाले.
G.Chippalkatti/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1774301)
Visitor Counter : 269